कोरिओग्राफर धनश्री वर्मा खूप वेळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे.(Claims) नुकताच धनश्री वर्माचा क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर धनश्री वर्मा ‘Rise And Fall’ या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचे नाते कामय चर्चेत राहिले आहे. आता मात्र ‘Rise And Fall’ शोमध्ये धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यासंबंधित मोठा खुलासा केला आहे.

शोमध्ये धनश्री वर्मा आणि कुब्रा सैत एकमेकांशी नाश्ता करताना गप्पा मारत असतात. ज्यात कुब्रा सैत धनश्रीला विचारते की, “आपल्याला कधी समजते की नातं भविष्यात चालणार नाही? (Claims)” तेव्हा धनश्री उत्तर देत म्हणाली की, “पहिल्या वर्षात…मी तर दुसऱ्या महिन्यात त्याला पकडलं…” हे ऐकताच कुब्रा सैतला मोठा धक्का बसतो. अशाप्रकारे युजवेंद्र चहलचे नाव न घेता धनश्रीने आपल्या फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा 2020मध्ये लग्न बंधनात अडकले होते. त्यानंतर 2025 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या 5 वर्षांनी हे जोडपे विभक्त झाले आहे.(Claims) तसेच धनश्री वर्माने या शोमध्ये युजवेंद्र चहलकडून आपण पोटगी घेतली नसल्याचे सांगितले आहे. सध्या युजवेंद्र चहलचे नाव आर जे महावशसोबत जोडले जात आहे.धनश्री वर्माचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती आपल्या हटके डान्स स्टाइलसाठी ओळखली जाते. तसेच ‘Rise And Fall’मधील तिचा गेम चाहत्यांना खूप आवडत आहे. या शोमध्ये धनश्री वर्मा आपल्या नात्याबद्दल आणखी किती खुलासे करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *