सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड(opportunity)कडून मोठी संधी जाहीर झाली आहे. RRB ने 2025 पर्यंत एनटीपीसी भरतीसाठी एकूण 8,875 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 5,817 पदं ग्रॅज्युएट पास उमेदवारांसाठी, तर 3,058 पदं अंडरग्रॅज्युएट 12वी पास उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.ग्रॅज्युएट पदांपैकी सर्वाधिक भरती मालगाडी प्रबंधक 3,423 पदं यासाठी आहे. त्याचबरोबर ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट-कम-टायपिस्ट 921 पदं आणि स्टेशन मास्टर 615 पदं यासाठी देखील जागा आहेत.

याशिवाय सीनियर क्लर्क-कम-टायपिस्ट 638 पदं, चीफ(opportunity) कमर्शियल-कम-टिकट सुपरवायझर 161 पदं आणि ट्रॅफिक असिस्टंट मेट्रो रेल्वे 59 पदं यांचाही समावेश आहे.अंडरग्रॅज्युएट 12वी पास स्तरावर सर्वाधिक भरती कमर्शियल-कम-टिकट क्लर्क 2,424 पदं साठी आहे. तसेच अकाउंट्स क्लर्क-कम-टायपिस्ट 394 पदं, ज्युनिअर क्लर्क-कम-टायपिस्ट 163 पदं आणि ट्रेन क्लर्क 77 पदं यासाठी देखील संधी आहे. या भरतीत SC, ST, OBC आणि EWS उमेदवारांना आरक्षण नियमांनुसार लाभ मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट www.rrbcdg.gov.in ला भेट द्या
नवीन नोंदणीसाठी ईमेल व मोबाईल क्रमांक वापरा
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व पद निवडा
फोटो व स्वाक्षरी अपलोड करा
शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
प्रिंट आऊट जतन करून ठेवा
सामान्य, OBC, Ews उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹500 अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST, महिला, दिव्यांग, माजी सैनिक प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹250 अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.CBT-1 स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात येणार असून या परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण ९० मिनिटांची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेत सामान्य जागरूकता विषयात 40 प्रश्न विचारले जातील. गणित विषयासाठी ३० प्रश्ने तर बुद्धिमत्ता व तर्कशक्ती गुणांसाठी 30 प्रश्ने विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंगमध्ये 0.25 गुण कापले जातील.

CBT-2 पोस्ट-विशिष्ट परीक्षा

एकूण 120 प्रश्न
सामान्य जागरूकता : 50
गणित : 35
बुद्धिमत्ता व तर्कशक्ती : 35
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.(opportunity) ही भरती रेल्वेत नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी संधी आहे.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *