अलीकडेच क्रोम ब्राउझर आणि गुगलच्या जेमिनी एआयच्या (phone)एकत्रीकरणाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही अहवालांनुसार, अद्ययावत क्रोम आता स्मार्टफोनवरून नाव, स्थान, डिव्हाइस आयडी, ब्राउझिंग आणि शोध इतिहास, उत्पादनांशी केलेल्या परस्परसंवादांची नोंद आणि खरेदीचे रेकॉर्डसह संवेदनशील माहिती गोळा करू शकतो. या बदलाला कंपनीने आतापर्यंतचे सर्वात मोठे अपग्रेड म्हटले असले तरी सायबरसुरक्षा कंपन्यांनी आणि तज्ञांनी याला गोपनीयतेवर मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. एका अहवालानुसार क्रोम+जेमिनी एकत्रितपणे साधारण इतर एआय-ब्राउझर्सपेक्षा जास्त प्रकारची माहिती ट्रॅक करतात.

दरम्यान, इतर ब्राउझरशी तुलना करताना म्हटले आहे की मायक्रोसॉफ्ट एज कोपायलटसह आणि काही इतर ब्राउझर्सनी तुलनेने कमी डेटा ट्रॅक केला आहे, तर Parplixity, Opera, Brave इतरांपेक्षा आणखीनच कमी माहिती गोळा करतात. म्हणूनच, जेमिनी क्रोममध्ये जोडल्यावर वापरकर्त्यांनी त्यांची माहिती कितपत असुरक्षित होऊ शकते हे समजून घेणे गरजेचे आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.दरम्यान, फक्त क्रोमच नव्हे तर एज, फायरफॉक्स आणि इतर ब्राउझर्सवर देखील एआय-आधारित एक्सटेंशन्स उदा. ChatGPT प्लगइन्स उपलब्ध आहेत.(phone) परंतु या टूल्सची इन्स्टॉलेशन केल्याने वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती तृतीय-पक्षांकडे जाऊ शकते. अधिकृत स्टोअरमधूनही काही एक्सटेंशन्स नंतर डेटा लीकमध्ये पकडले गेले आहेत, अशी माहिती तांत्रिक अहवालांमध्ये दिसते.
तथापी, गुगलाने म्हटलं आहे की, Gemini in Chrome फक्त तेव्हाच सक्रिय होते जेव्हा वापरकर्ता ते स्वतः वापरतो. मात्र काही रिपोर्ट्समध्ये असा खुलासा आहे(phone) की वापरकर्त्याने जेव्हा वापरले तेव्हा संबंधित डेटा कंपनीकडे हस्तांतरित केला जातो. आणखी एक बाब म्हणजे गुगलचा प्रतिकृती-आधारित इमेज टूल Nano Banana आता Google Photos मध्ये आणले जाऊ शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की, प्रतिमांमधील बायोमेट्रिक तपशील, GPS स्थान आणि डिव्हाइस मेटाडेटा यांसारखी अत्यंत संवेदनशील माहिती यातून मिळू शकते.
डेटा संकलन टाळण्यासाठी या सेटिंग्ज करा
- सेटिंग्ज → AI Innovations → Gemini in Chrome या मार्गावर जाऊन Gemini ची क्रियाकलाप तपासा.
- Gemini Apps Activity अंतर्गत, डेटा सेव्हिंग 72 तासांपेक्षा जास्त होऊ देऊ नका.
- फोनच्या सेटिंग्जमधून Location, Camera इत्यादी परवानग्या मॅन्युअली तपासा आणि अनावश्यक परवानग्या बंद ठेवा.
- अनावश्यक आणि संशयास्पद एक्सटेंशन्स इन्स्टॉल करू नका;(phone) अधिकृत स्टोअरमधील पुनरावलोकने आणि परवानगी तपासा.

तज्ञांचा निष्कर्ष –
याशिवाय, सायबरसुरक्षा तज्ञांच्या मते, मोफत अशी दिसणारी एआय साधने प्रत्यक्षात मोफत नसतात.(phone) वापरकर्त्यांची माहितीच त्यांचे उत्पादन बनते. त्यामुळे वापरकर्त्यांनी आपल्या निर्णयांमध्ये जागरूकता ठेवावी आणि सेटिंग्ज व परवानग्या नीट तपासूनच एआय फायदे घ्यावेत.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,