शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजेत यामुळे शिवसेनेकडून(delivered)एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यभरात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्र उभारले जाणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. या सहायता केंद्रमार्फत शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचवल्या जाणार आहेत. या सहायता केंद्रमार्फत जनसामान्यांना तालुक्यापर्यंत येण्याची गरज पडणार नसल्याचे उदय सामंत म्हणाले. 3 ऑक्टोंबर अभिजात भाषा दिन हा मराठी भाषा सप्ताह आम्ही साजरा करतो. या कार्यक्रमाची सांगता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार आहे. पहिल्या वर्धापन दिनी आम्ही मोदींचे आभार मानतो. अमरावती संभाजी नगर येथे ही कार्यक्रम होणार असल्याचे सामंत म्हणाले. काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबत कामाला लागणयाच्या सूचना दिल्या. काही लोक टिका टिपण़्णी मोकळ्या खूर्च्यांसमोर केली. आम्ही आमच्या राज्यभरातील पदाधिकार्यांना न येता पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केल्याचे उदय सामंत म्हणाले.

‘शिवसेना आपल्या दारी घेऊन आली शिदोरी’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. ग्रामीण भागातील लोकांना विविध योजनांची माहिती किंवा ती मिळवून देण्यासाठी आमचे पदाधिकारी मदत करतील. कालच्या मेळाव्याला किती गर्दी होती हे तुम्ही दाखवलं. मोकळ्या खुर्चा पाहून आम्ही कसं चिखलात लोळवलं हेही आपण पाहिलं. (delivered)कार्यकर्त्याला विनाकारण त्रास देऊन चिखलात बोलवलं नाही. तर राज्यभरात मदत पुरवली यासह अनेक उपक्रम आपण केले. मुलांचे शिक्षणाला काही कमी पडू नये यासाठी साधन सामग्रीही आम्ही उपलब्ध करून दिली. प्रत्येक शिवसैनिकाने रिलिफ फंडातही पैसे देण्याचे आवाहन केले. हा दोन मेळाव्यातील फरक असल्याचे उदय सामंत म्हणाले.

यावेळी उदय सामंत यांनी गणेश नाईकांच्या विधानावरही भाष्य केले. नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, म्हणजेच त्याच्या हाती सत्ता दिली जाणार नाही. मुख्यमंत्र्याना हे पटतं का ? (delivered)समन्वय समितीतही संवाद साधण्यासाठी आहे. उठसूट एकनाथ शिंदेवर टिका खपवून घेणार नाही. नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी शिंदेंची वेळ घ्यावी. ज्याची ज्या पद्धतीने कुवत असते त्याला ते पद मिळते. आमच्या खासदारांनाही बोलता येत नाही का पण साहेब सांगतात की मित्र पक्षावर बोलू नका म्हणून सर्व शांत आहेत, असेेही सामंत म्हणाले.राजन तेलींच्या पक्ष प्रवेशावरही उदय सामंतांनी भाष्य केले. कोकणात कुठेही रस्सीखेच नाही. दिपक केसकर यांचा सन्मान आहे ते फायदाच करतील. तेली हे कणकवली मतदार संघावर फोकस करतील. केसरकर सांगतील तोच उमेदवार ठरेल. जिथे आमदार नाहीत तिथे तेली संघटना मजबूत करतील, असे उदय सामंत म्हणाले.

यावेळी उदय सामंतांनी संजय राऊतांवर टीका केली. कोणाच्या सांगण्याने कोणाची डिग्री खोटी ठरत नाही. आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पहावं. काल खूर्च्या का खाली होत्या ते पहावं. अनंत अडचणी येऊन सुद्धा जो आपली इमेज करतो, जे काही चाललय फार चुकीचं आहे. (delivered)नियती बघतेय, काळ उत्तर नक्की देईल. जनतेने उत्तर दिलयं गर्दी कुठे होती हे पाहीलं. जी लोकं मुंबईतून बाहेर गेली आहेत त्यांना आणण्याची जबाबदारी शिंदेंनी स्विकारली हे कोणाला तरी झोंबत आहे. स्वत:ची सत्ता गेली की काही कारण द्यायचं मग आरोप करायचे, असे सामंत राऊतांना उद्देशून म्हणाले.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ

 मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *