महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इलेक्टोनिक बॉण्ड बाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(Electronic)कागदी बॉण्डपासून आता आयातदार आणि निर्यातदारांना सुटका मिळणार आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात करण्यात येणार आहे. ई-बॉण्ड प्रणालीमुळे अनेक फायदे होणार आहेत.अनेक वेळा कागदी बॉण्ड मध्ये फसवणुकीच्या घटना समोर येत होत्या. त्याला आता कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे आळा बसणार आहे.

आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे.(Electronic) ई-बॉण्ड प्रणाली National E-Governance Services Limited आणि National Informatics Centre यांच्या तांत्रिक सहकार्याने आयातदार व निर्यातदारांसाठीची सीमाशुल्क प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ होणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत ई-स्टॅम्पिंग, ई-स्वाक्षरी, ऑनलाइन पेमेंट, रिअल टाइम पडताळणी, डिजिटल रेकॉर्ड्स यांचा वापर होणार आहे. सर्व प्रक्रिया वेगवान, सुरक्षित व पारदर्शक बनवण्यावर सरकारचा भर आहे. (Electronic)कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाइन भरण्याची सोय होणार आहे. उद्योगक्षेत्रासाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. व्यवहारातील खर्च व वेळ वाचणार असून कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार आहे

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ

 मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *