गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.(heavy)ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतरही पाऊस परतण्याची चिन्हे दिसत नसून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असून, त्याचबरोबर गुजरातजवळ अरबी समुद्रातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर तिहेरी संकट घोंगावत असून ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका वाढला आहे.

‘शक्ती’ चक्रीवादळामुळे ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना याचा फटका बसणार आहे.(heavy) हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचा आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, तर काही ठिकाणी ताशी ६५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
फक्त किनारपट्टीच नव्हे तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांनाही या वादळाचा परिणाम भोगावा लागणार आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतीसाठी या पावसाचा फायदा होऊ शकतो, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. (heavy)त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात एकाच वेळी दोन कमी दाबाचे पट्टे आणि ‘शक्ती’ चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेले दोन वेगळे दाबाचे पट्टे आता तीव्र होत असून, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल १४ राज्यांना पावसाचा हाय अलर्ट दिला आहे, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

मुंबईसह किनारपट्टीवर वादळाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे, सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (heavy)मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच किनारपट्टीवरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलण्याची तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.३ ते ७ ऑक्टोबर हा कालावधी महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहे. वादळाची तीव्रता वाढल्यास किनारपट्टीवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता चक्रीवादळ द्वारकापासून ३४० किमी अंतरावर होते आणि ४ ऑक्टोबरपासून त्याची तीव्रता वाढून ते गंभीर चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर