प्रेम एक अशी गोष्ट आहे जी कधीही, कुठेही, कोणावरही जडू शकते.(grandchild)त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. आजकाल तुम्ही अशी अनेक प्रकरण पहाल, ज्यात लोक लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवतात. उत्तर प्रदेशच्या झांशीमध्ये एका आजीबाईंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. तिला दोन नातू सुद्धा आहेत. मोठं कुटुंब आहे. पण तरीही आजीबाईंवर प्रेमाची अशी नशा स्वार झाली की, ती एका 35 वर्षाच्या युवकासोबत पळून गेली. सोबतच घरातून निघताना कॅश आणि सुनेचे दागिने घेऊन पसार झाली. आता कुटुंब पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहे. कुटुंब आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे. आजी जेव्हापासून पळालीय, कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळालीय. पैशामुळे कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

ही प्रेम कथा मऊरानीपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. स्यावरी गावात कामता प्रसाद आदिवासी आपल्या कुटुंबासोबत राहतात. घरी पत्नी, दोन मुलं, दोन सुना आणि दोन नातू असा परिवार आहे. (grandchild)पण सध्या ते पत्नीसाठी तुरुंगाच्या फेऱ्या मारत आहेत. कामता प्रसाद यांची पत्नी सुखवती आपल्या 35 वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली. सोबत कॅश आणि दागिने घेऊन पळाली. सुनांचे दागिने घेऊन पळाली. यामुळे कामता प्रसाद यांचं कुटुंब आर्थिक आणि भावनिक दोन्ही आघाडीवर कोसळून गेलय.

“मी पेशाने रोजंदारी मजूर आहे. मेहनत करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. (grandchild)अडीच वर्षांपूर्वी मी पत्नीसोबत भिंड-मुरैना क्षेत्रात गेलो होतो. तिथे आम्हाला काम मिळालं. तिथे माझी पत्नी सुखवतीची मैत्री अमर सिंह प्रजापतीशी झाली. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु झालं. आधी आम्हाला संशय आला नाही. पण नंतर मला समजलं की पत्नी दिवसभर फोनवर कोणाशी तरी बोलत असते. मी फोन चेक केला. त्यात अमरचा नंबर होता“ असं कामता प्रसाद आदिवासीने सांगितलं.कामता प्रसादने सांगितलं की, माझ्या दोन्ही सुनांना सुखवतीवर संशय आला. आम्ही तिला सांगितलं की, तू अमरशी बोलत जाऊ नकोस. पण ती लपून-छपून अमरला भेटतच होती. काही दिवसांपूर्वी मी माझ्या मुलाला उपचारासाठी झांसीला घेऊन गेलेलो, त्यावेळी सुखवतीने संधी साधून घरातून दागिने आणि जवळपास 40 हजार रुपये घेऊन अमरसोबत पसार झाली.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर