किमान सरासरी शिल्लक रक्कम म्हणजे बचत खात्यात दर महिन्याला ठराविक(customers) किमान रक्कम ठेवणे आवश्यक असते. जर ती रक्कम खात्यात नसेल, तर बँक दंड आकारते. विविध बँकांमध्ये हा शुल्क भिन्न असतो. मात्र किमान शिल्लक रकमेवरील दंड काही बँकांनी रद्द केला होता. या पार्श्ववभूमीवर आता आणखी एका बँकेने ग्राहकांना दिलासा दिला आहे.‘भारतीय ओव्हरसीज बँकेने आता खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर आकारला जाणारा दंड पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

आधी काही योजनांसाठी हा दंड रद्द करण्यात आला होता, परंतु आता हा निर्णय सर्व बचत योजना खातेदारांवर लागू झाला आहे. याचा उद्देश सर्व ग्राहकांना सोप्या बँकिंगचा लाभ मिळवून देणे आहे.(customers) भारतीय ओव्हरसिज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अजय कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, बँकेचा उद्देश खातेदारांना दिलासा देणे आहे. या निर्णयामुळे बँकिंग प्रक्रिया प्रत्येक ग्राहकासाठी सोपी होईल आणि ग्राहकांना बँकेच्या सेवांचा फायदा घेता येईल. १ ऑक्टोबर 2025 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
किमान सरासरी शिल्लक रक्कमेवरील दंड हटवल्यामुळे मुख्यतः छोटे खातेधारक आणि पेन्शनधारक यांना फायदा होईल. यापूर्वी छोटी बचत करणाऱ्या ग्राहकांना शिल्लक कमी असल्यामुळे दंड भरण्याची गरज होती.(customers) बँकेच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीईओ अजय कुमार श्रीवास्तव म्हणाले की, बँकिंग सुविधा प्रत्येक ग्राहकाला सहज मिळावी, हे सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

किमान सरासरी शिल्लक रक्कम म्हणजे बचत खात्यात दर महिन्याला ठराविक किमान रक्कम ठेवणे आवश्यक असते. जर ती रक्कम खात्यात नसेल, तर बँक दंड आकारते. विविध बँकांमध्ये हा शुल्क भिन्न असतो.(customers) स्टेट बँक ऑफ इंडिया ने सर्वात पहिला निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँकेने देखील किमान शिल्लक रकमेवरील दंड रद्द केला होता. भारतीय ओव्हरसीज बँकेचा हा निर्णय बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी बँकिंग आणखी सोपी होईल.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर