सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट(invest) प्लॅन हे आजच्या काळात सर्वसामान्यांसाठी श्रीमंत होण्याचं उत्तम माध्यम ठरत आहे. विशेषतः जर गुंतवणुकीची सुरुवात कमी रकमेपासून केली तरीही, दीर्घकालीन संयम आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या जोरावर मोठं भांडवल तयार होऊ शकतं. याचाच एक उत्कृष्ट नमुना म्हणजे दररोज केवळ ₹100 SIP मध्ये गुंतवणूक केल्यास मिळणारा लाभ.

आज आपण पाहणार आहोत की जर एखादी व्यक्ती दररोज ₹100 म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये गुंतवत राहिली, तर 10, 20 आणि 30 वर्षांनंतर त्यांना किती रक्कम प्राप्त होऊ शकते. ही गुंतवणूक दररोजच्या खर्चात फारशी वाढ न करता, संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकते.
10 वर्षे SIP केल्यास, एकूण गुंतवणूक रक्कम ₹3,65,000 इतकी होते. बाजारातील सरासरी 12 टक्के वार्षिक परताव्याचा विचार करता, तुमचं SIP फंड 10 वर्षांत अंदाजे ₹6,78,340 होऊ शकतो. यामध्ये सुमारे ₹3,13,340 हा फक्त भांडवली नफा म्हणजेच व्याजातून झालेला लाभ असतो.
20 वर्षांसाठी रोज ₹100 SIP केली, तर एकूण गुंतवणूक(invest) रक्कम ₹7,30,000 इतकी होते. यावर चक्रवाढ व्याजाच्या जोरावर तुम्हाला ₹20,55,161 एवढा नफा मिळतो आणि एकूण फंड ₹27,85,161 पर्यंत पोहोचतो. ही रक्कम भविष्यातील घर, शिक्षण किंवा कोणत्याही मोठ्या उद्दिष्टासाठी उपयोगी ठरू शकते.

30 वर्षात मिळणार तब्बल 93 लाख, आर्थिक स्वातंत्र्याचं स्वप्न साकार :
जर तुम्ही हीच सवय 30 वर्षे टिकवली, तर तुमची एकूण गुंतवणूक फक्त ₹10,95,000 असते. पण वेळ, संयम आणि कम्पाउंडिंगच्या जादूने यावर मिळणारा नफा जवळपास ₹82,33,629 इतका होतो. परिणामी, तुमचं निवृत्तीनंतरचं SIP फंड ₹93,28,629 एवढा मोठा होतो.
अर्थात, ही गणितं बाजारातील सरासरी 12 टक्के परताव्याच्या आधारावर आहेत. वास्तविक परतावा तुमच्या निवडलेल्या म्युच्युअल फंड्सच्या प्रकारावर अवलंबून असतो. तरीसुद्धा, दीर्घकाळासाठी ही एक शिस्तबद्ध आणि यशस्वी गुंतवणूक पद्धत मानली जाते.
हेही वाचा :