इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने (engineering) कोल्हापूर शहरातील जरगनगर परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव नितीन सरनाईक, असं या अवघ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. गौरवने घरातील छताच्या हुकाला बेडशीटने गळफास लावून राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.कोल्हापुरातील जरग नगर परिसरात राहणारा गौरव हा सरनाईक दाम्पत्याचा एकुलता मुलगा होता. सुरवातीपासूनच शिक्षणात तो उज्वल होता. दहावीत 95 टक्के आणि बारावीत 75 टक्के गुण त्याने मिळवले होते. पुढे इंजिनिअरिंगच्या कोल्हापुरातील नामांकित महाविद्यालयात प्रथम वर्षात त्याने प्रवेश घेतला होता. त्याचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. मुलाने अशा पद्धतीने अचानक घेतलेल्या दुर्दैवी निर्णयामुळे सरनाईक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी सकाळी मुलाने घरातील छताच्या हुकाला बेडशीटने गळफास लावून घेतल्याचं आई-वडिलांच्या निदर्शनास आलं. गौरवच्या वडिलांनी तातडीने गळफास सोडवून त्याला छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार सीपीआर रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच गौरवचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. (engineering)या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.गौरवच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून त्याच्या मोबाईलची तपासणी आणि मित्रांशी सखोल संवाद सुरू आहे. पोलिसांच्या मते, कुटुंबात किंवा शैक्षणिक स्तरावर कोणतीही मोठी अडचण दिसून आली नाही, तरीही मानसिक तणाव किंवा वैयक्तिक दबावाचा मुद्दा तपासला जात आहे.

शैक्षणिकदृष्ट्या अतिशय हुशार आणि मनमिळावू असलेल्या गौरवने नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता. त्यातच त्याने असं धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे त्याचे मित्र आणि शिक्षकही धक्क्यात आहेत. परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे. आई-वडिलांसाठी तो एकुलता आधार होता;(engineering) त्याने अचानक घेतलेला टोकाचा निर्णय कुटुंबाला आणि समाजाला चटका लावणारा आहे. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा तपास करत असून, मोबाइल डेटाबद्दल आणि मित्रपरिवाराच्या जबाबावरून आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
6 महिन्यात पैसे दुप्पट!
केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ;
आजच खाण्यात ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन करा….