कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
खजुराहो मंदिर संकुलातील भगवान विष्णूंच्या मूर्ती. बद्दल, मनात कोणताही हेतू न ठेवता केलेल्या मिश्किल टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice)भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा एका ज्येष्ठ वकिलाने केलेला प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. देशभर विशेषतः महाराष्ट्रात त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि त्या स्वाभाविकही आहेत. खरे तर ” ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा”असाच व्यवहार केला पाहिजे.खजुराहो मंदिर संकुलातील भगवान विष्णूच्या मूर्तीची दुरुस्ती केली पाहिजे, जिर्णोद्धार केला पाहिजे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ वकील राकेश तिवारी यांनी एका याचिकेद्वारे केली होती. या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर झाली. ही याचिका फेटाळून लावताना”तुझ्या देवाकडून काम करून घे”अशा आश्रयाची मिष्कील टीका टिपणी न्या. गवई यांनी केली होती. ही टिपणी करताना त्यांच्या मनात हिंदुधर्मीयांच्या देवदेवतांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आणि म्हणूनच त्यांच्या या वक्तव्याविषयी कोणीही आक्षेप घेतला नव्हता.

एडवोकेट राकेश तिवारी यांना मात्र सरन्यायाधीशांची टीकाटिपणी आवडली नाही. त्यांनी त्याचा धर्माशी संबंध जोडला. धर्म संकटात येत असेल तर कोणीही गप्प बसता कामा नये. माझ्याकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूटभिरकावण्याची झालेली कृती याबद्दल मला किंचितही खेद वाटत नाही असे हे महाशय बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केलेले आहे.सोमवारी हा गंभीर प्रकार सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या(Chief Justice) न्याय दालनात घडल्यानंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रात त्याची तीव्रता अधिक आहे कारण सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे आहेत आणि अमरावतीचे रहिवासी आहेत आणि म्हणूनच संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे.
राकेश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात खजुराहो मंदिर संकुल आणि तेथील भगवान विष्णूच्या मूर्तीची दुरुस्ती किंवा जीर्णोद्धार करण्याची केलेली मागणी चुकीची आहे. ही मागणी त्यांनी केंद्र शासनाकडे किंवा पुरातत्त्व विभागाकडे करणे आवश्यक होते.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने पायातील बूट भिरकावण्याची राकेश तिवारी या वकिलाकडून झालेली कृती ही संविधान विरोधी आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. उपासना पद्धतीला मान्यता दिली आहे मात्र त्याचेप्रदर्शन सार्वजनिक रित्या होता कामा नये. किंवा धर्म हा घराच्या चौकटीच्या आत ठेवला पाहिजे हे भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे.राकेश तिवारी यांनी धर्म सर्वोच्च न्यायालयात नेला.ही त्यांची कृतीच चुकीची आहे. या चुकीच्या कृतीतून नंतर त्यांनी केलेली कृती ही महाभयंकर आहे. आता त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई होऊ शकते. बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश तिवारी यांना तर तुमची सनद कायमसाठी रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसच बजावली आहे.

हिंदू धर्मावर तसेच अन्य धर्मावर आणि त्यांच्या देवदेवतांवर भाष्य करणारे परेश रावल यांचा” ओह माय गॉड”, आमिर खान याचा”पिके”असे काही चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकून गेले आहेत. या चित्रपटांमध्ये हिंदू देवतांवर काही बोलले गेले आहे आणि ते टिकेच्या स्वरूपात होते आणि आहे. पण त्याबद्दल कोणाच्या काही प्रतिक्रिया नव्हत्या. लोकांनी ते सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून स्वीकारले. राकेश तिवारी यांनी या चित्रपटांबद्दल तेव्हा आक्षेप घेतला पाहिजे होता.सरन्यायाधीश भूषण गवई यांनी टिप्पणी केली. ती मिस्कील सुरुवात होती. हिंदू देवदेवतांबद्दल आकस ठेवण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता आणि नाही.न्यायाधीशाकडून आपणाला न्याय मिळणार नाही. न्यायाधीश बदलून पाहिजे, अन्य न्यायाधीशासमोर आपल्या खटल्याची सुनावणी व्हावी या हेतूने न्यायाधीशाचा जाणून-बुजून अवमान करण्याच्या घटना यापूर्वी अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत.

न्यायाधीशाना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे, चप्पल फेकून मारणे असे प्रकार घडले आहेत आणि त्याबद्दल संबंधितांना योग्य ती शिक्षा मिळाली आहे. मात्र अशा प्रकारची घटना सर्वोच्च न्यायालयात आणि सरन्यायाधीशांच्या न्याय दालनात पहिल्यांदाच घडली आहे. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होणे म्हणजे सर्वसामान्य जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास आहे, न्यायालयाबद्दल, न्यायधीशाबद्दल आदर आहे याचे ते द्योतक आहे.
हेही वाचा :
मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…
घरात सकारात्मकता वाढेल …..
Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध….