बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.(trouble)मात्र, यावेळी कारण तिचा चित्रपट नव्हे तर एक मोठं आर्थिक फसवणुकीचं प्रकरण आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीची तब्बल पाच तास कसून चौकशी केली असून, या चौकशीने तिच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. ही कारवाई लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी (यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. कोठारी यांनी आरोप केला आहे की, शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी त्यांच्या कंपनीकडून तब्बल 60 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टीनेवर्ष 2015 मध्ये 75 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र, नंतर त्यांनी कर्जाऐवजी ती रक्कम “गुंतवणूक” म्हणून स्वीकारण्याची सूचना दिली. (trouble)या प्रस्तावावर कोठारी यांनी दोन टप्प्यांमध्ये एकूण 60 कोटी रुपये दिले — एप्रिल 2015 मध्ये 31.95 कोटी आणि सप्टेंबर 2015 मध्ये 28.53 कोटी.कोठारींचा दावा आहे की, शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली ही रक्कम घेतली, पण ती वैयक्तिक कारणांसाठी वापरली. पैसे परत मागूनही ते परत मिळाले नाहीत, म्हणूनच त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत राज कुंद्रासह पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत. (trouble)सप्टेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा आणि राजविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले होते, जेणेकरून ते देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत.
दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि तिचे वकील प्रशांत पाटील यांनी या सर्व आरोपांना पूर्णपणे खोटे आणि निराधार म्हटले आहे. “आम्ही कायद्याचा आदर करतो आणि तपास यंत्रणेसमोर सत्य मांडू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

फक्त कल्पना हवी! 

शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा

कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *