आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी(consume) जिरं, बडीशेप आणि ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारून चेहऱ्यावर ग्लो येतो. जाणून घ्या डिटॉक्स पेय बनवण्याची कृती.

शरीरात साचून राहिलेल्या घाणीचा आणि विषारी वायूचा परिणाम थेट चेहऱ्यावर होतो, ज्यामुळे पिंपल्स, मुरूम किंवा काळे डाग वाढू लागतात. त्यामुळे आहारात बदल करून सहज पचन(consume) होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी वायू आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे महिनाभर नियमित सेवन केल्यास सकारात्मक फरक दिसून येईल.
डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची कृती:
बडीशेप
जिरं
ओवा
काळे मीठ
पाणी
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात जिरं, ओवा आणि बडीशेप घालून १० मिनिटं पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. यामुळे पदार्थांमधील अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याचे सेवन करा. डिटॉक्स पेयांचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग कमी होऊन चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी हेल्दी पेयांचे सेवन करावे. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी बडीशेप, जिऱ्याचे पाणी प्यावे.
बडीशेपचे फायदे:
जेवणानंतर सगळ्यांचं बडीशेप खाण्याची सवय असते. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. बडीशेप त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्वचा नैसर्गिकरित्या ताजीतवानी ठेवण्यासाठी बडीशेप किंवा बडीशेपचे पाणी प्यावे.
जिर्याचे फायदे:
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे जेवणाला फोडणी देताना जिऱ्याचा भरपूर वापर केला जातो. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. चेहऱ्यावर चमक वाढवण्यासाठी नियमित जिरं, बडीशेप आणि ओव्याचे पाण्याचे न चुकता सेवन करावे.
हेही वाचा :
मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…
घरात सकारात्मकता वाढेल …..
Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध….