पूर्वीच्या काळी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चपात्यांचे लाडू. जेवणातील पदार्थ बनवतना चपाती आवर्जून बनवले जाते. कारण चपाती (chapati)खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतं नाही. पण काहीवेळा जास्त चपात्या बनवल्या जातात. अशावेळी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून नेमकं काय बनवावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चपातीचे चविष्ट लाडू बनवू शकता.

हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. अतिशय कमी वेळात चपातीचे लाडू तयार होतात. घरातील प्रत्येकाला जेवणानंतर काहींना काही गोड पदार्थ खायला हवे असतात, अशावेळी चपातीचे लाडू अतिशय उत्तम पर्याय आहे. गव्हाची चपाती खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय चपातीमध्ये कार्बोहायड्रेट, लोह आढळून येते. चला तर जाणून घेऊया चविष्ट चपातीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
शिल्लक राहिलेल्या चपाती
गूळ
सुका मेवा
वेलची पावडर
कृती:
चपातीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर चपाती(chapati) कुरकुरीत होईपर्यंत भाजा. यामुळे लाडूला सुंदर चव येईल.चपाती थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या. चपाती एकदम बारीक वाटू नये.तयार केलेला चपातीचा चुरा मोठ्या वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात किसलेला गूळ किंवा गुळाची पावडर टाकून मिक्स करून घ्या.त्यानंतर त्यात तुपात भाजलेला सुका मेवा आणि वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.हाताला तूप लावून तुम्हाला हवे त्या आकारात चपातीचे लाडू बनवून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चपातीचे खमंग लाडू.
हेही वाचा :
राजकारणात पुन्हा भूकंप, शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा
कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य
एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला