मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(sisters)योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची पात्र महिलांना आतुरतेने प्रतीक्षा होती. राज्य सरकारने आता ही रक्कम लवकरच देण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याकरिता 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत, त्यामुळे लवकरच लाभार्थींना ही रक्कम मिळू शकते. महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. त्यानंतर जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांची रक्कम लाभार्थींना दिली गेली आहे.

ऑगस्ट महिन्याची रक्कम सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस वितरित करण्यात आली होती. आता सप्टेंबर महिन्याचे हप्ते कधी येणार, याकडे सर्व लक्ष लागले आहे. पण लवकरच सप्टेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचे कळत आहे.योजनेची एक महत्वाची अट अशी आहे की, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, त्या कुटुंबातील महिला या योजनेस पात्र ठरतील. पात्रता तपासण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यात आधार कार्ड पडताळणी तसेच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी प्रक्रियेनंतर ज्या महिला पात्र नाही किंवा अटी पूर्ण होत नाहीत, त्यांना लाभार्थी यादीतून वगळले जाईल. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आल्याने चौकशी प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे ई-केवायसी नंतर लाडक्या बहिणींची (sisters)संख्या कमी होऊ शकते.
हेही वाचा :
अमित शाहांनीही बदलला ईमेल; झोहो मेलमध्ये असं काय आहे खास..
सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात