व्हॉट्सअॅप लवकरच एक मोठा बदल आणण्याच्या तयारीत आहे. युजर्सना मेसेज पाठवण्यासाठी आता फोन नंबरची गरज भासणार नाही. या नव्या फीचरमुळे(feature) वापरकर्ते एकमेकांशी युजरनेमद्वारे संपर्क साधू शकतील. त्यामुळे गोपनीयता अधिक सुरक्षित राहणार असून, नंबर शेअर करण्याची गरजही उरणार नाही.

२००९ पासून व्हॉट्सअॅपवर लॉगिनसाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. मात्र, मेटा कंपनी आता ही जुनी पद्धत बदलण्याच्या तयारीत असून, टेलिग्रामप्रमाणे युजरनेम-आधारित प्रणाली सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.
ही सुविधा सध्या अँड्रॉइडच्या बीटा वर्जन (2.25.28.12) मध्ये टेस्ट केली जात आहे, असे WABetaInfo ने उघड केले आहे. या फीचरअंतर्गत युजर्सना आधीच आपले युजरनेम ‘रिजर्व्ह’ करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे अधिकृत लॉन्चपूर्वी स्वतःचे नाव सुरक्षित ठेवता येईल.
व्हॉट्सअॅप युजरनेमसाठी काही अटी लागू आहेत —
युजरनेम “WWW” ने सुरू होता कामा नये, जेणेकरून वेबसाइटसारखा गोंधळ होऊ नये.
नावात किमान एक अक्षर (a-z) असणे आवश्यक आहे.
संख्या आणि विशेष चिन्हे वापरण्याची परवानगी दिली जाईल.

सध्या हे फीचर(feature) सर्वांसाठी उपलब्ध नाही आणि युजरनेमद्वारे थेट चॅट करण्याची सुविधा अद्याप सुरु झालेली नाही. मात्र, तज्ञांच्या मते हे फीचर आगामी काही अपडेट्समध्ये संपूर्णपणे कार्यान्वित केले जाईल.या बदलामुळे व्हॉट्सअॅपचा वापर अधिक सुरक्षित, गोपनीय आणि वापरकर्तानुकूल होणार आहे.
हेही वाचा :
मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…
घरात सकारात्मकता वाढेल …..
Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध….