OpenAI चे लोकप्रिय चॅटबोट ChatGPT चा वापर आपल्या रोजच्या जिवनात केला जातो. आपण आतापर्यंत प्रश्नांची (questions)उत्तर विचारण्यासाठी ChatGPT चा वापर करत होतो. आता ChatGPT वरून यूपीआय पेमेंट करणं देखील लवकरच शक्य होणार आहे. यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या चॅटबोटचा वापर केवळ प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी केला जात होता, आता त्याच चॅटजीपीटीच्या मदतीने पेमेंट करणं देखील शक्य होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने RazorPay औरनेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सह एजेंटिक पेमेंट्स सुविधा सुरु करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता कंपनी लवकरच याचे पायलट फीचर ChatGPT वर सुरु करण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने यूजर्स एका सिंगल प्रॉम्प्टद्वारे यूपीआई पेमेंट करू शकणार आहेत. एवढंच नाही तर युजर्स प्रॉप्म्ट टाकून ग्रॉसरी देखील ऑर्डर करू शकणार आहेत. ऑर्डर कन्फर्म होण्यापूर्वीच तुम्हाला चॅटजीपीटीवर या प्रोडक्टची किंमत देखील समजणार आहे. त्यानंतर युजर्स प्रॉम्प्ट टाकून अगदी काही क्षणात यूपीआयच्या मदतीने पेमेंट देखील करू शकणार आहेत.

Razorpay, NPCI, आणि OpenAI ने ChatGPT मध्ये एजेंटिक पेमेंट फीचर सुरु करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. याच्या मदतीने कंपनी एआय आधारित शॉपिंग आणि पेमेंट फीचर आणण्याची देखील तयार करत आहे. त्यामुळे युजर्स यूपीआयच्या मदतीने अगदी सहजपणे पेमेंट करू शकणार आहेत. हा प्रोजेक्ट सध्या पायलट फेजमध्ये आहे, त्याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. हे वैशिष्ट्य यूजर्सच्या एका लहान ग्रुपसाठी सुरू करण्यात आले आहे.

ChatGPT मध्ये एजेंटिक पेमेंट फीचर Razorpay ने तयार केले आहे. या फीचरमुळे AI चॅटबॉट यूजर्सच्या आवडीनुसार अ‍ॅक्सिस बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, यूपीआय सर्कल आणि यूपीआय रिझर्व्ह पे वरून ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहेत. कंपनीने याची सुरुवात Bigbasket सह केली आहे. यूजर्स चॅटजीपीटीवरून प्रॉम्प्ट लिहून ग्रॉसरी ऑर्डर करू शकणार आहेत. यासोबतच युजर्सना पेमेंटसाठी देखील प्रॉम्प्ट लिहावा लागणार आहे.

ChatGPT च्या या नवीन फीचरची सध्या चाचणी सुरु आहे. या फीचरमुळे ओपनएआई ला युजर्सच्या महत्त्वाच्या आर्थिक माहितीचा एक्सेस मिळणार आहे, ज्यामुळे(questions) युजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. युजर्सचा हा डेटा लिक झाला किंवा चुकीच्या हातात पडला तर युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. या डेटाचा गैरवापर झाल्यास ChatGPT, Razorpay आणि BigBasket पैकी कोण जबाबदार असेल हे देखील स्पष्ट नाही.

हेही वाचा :

 दीपिका पदुकोणने बॉलीवूडच्या वर्क कॅल्चरचे उघड केले सत्य

सासूसोबत S*x केल्याचं पत्नीच्या माहेरी समजलं अन् त्याने पत्नीला…

माधुरी दीक्षितचं ‘हे’ गाणं दुरदर्शन, रेडियोवर केलेलं बॅन…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *