सेवानिवृत्तधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी पेन्शन(Pension) योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन ₹1,000 वरून ₹2,500 करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला बेंगळुरू येथे होणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडला जाणार आहे.२०१४ साली निश्चित करण्यात आलेली ₹1,000 पेन्शन रक्कम आजच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अपुरी ठरत असल्याने, निवृत्त कर्मचाऱ्यांकडून या वाढीची मागणी सातत्याने होत होती. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा मिळू शकतो.

सध्या EPS अंतर्गत, किमान 10 वर्षे सेवा आणि 58 वर्षे वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. ज्यांनी नोकरी लवकर सोडली, त्यांना जमा रक्कम परत घेण्याचा किंवा कमी पेन्शनचा पर्याय दिला जातो.दरम्यान, EPFO ने PF रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. जर कर्मचाऱ्याचा UAN सक्रिय असेल आणि KYC पूर्ण झाले असेल, तर तो घरबसल्या ऑनलाईन PF काढू शकतो. क्लेम अर्ज मंजूर झाल्यानंतर 7-8 दिवसांत रक्कम थेट खात्यात जमा होते.

तथापि, ही पारंपरिक प्रक्रिया आता इतिहासजमा होणार आहे. कारण या वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून PF काढण्यासाठी नवी व्यवस्था लागू होणार आहे, ज्यामध्ये ई-केवायसी पूर्ण झाल्यावर कर्मचारी थेट एटीएम कार्ड किंवा युपीआय प्लॅटफॉर्मद्वारे काही मिनिटांत PF रक्कम काढू शकणार आहेत.यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ जास्त पेन्शनच नव्हे तर सोपी आणि तत्काळ निधीप्राप्तीची सुविधा मिळणार आहे — आणि यंदाची दिवाळी त्यांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे(Pension).
हेही वाचा :
अमित शाहांनीही बदलला ईमेल; झोहो मेलमध्ये असं काय आहे खास..
सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात