महावितरणमधील (Mahavitaran)सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केले असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.व्यवस्थापनाने सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत, तसेच रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सात संघटनांच्या संपाला विरोध करत राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम लागू केला असून, त्यामुळे हा संप बेकायदेशीर ठरला आहे.

महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, वीजपुरवठ्याबाबत अफवा किंवा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा सज्ज आहेत. कोणतीही तक्रार असल्यास २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.कृती समितीने खासगीकरण व पुनर्रचनेच्या मुद्द्यावर संपाची नोटीस दिली होती. राज्याचे अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कोणत्याही प्रकारचे खासगीकरण होणार नाही याची हमी दिली. महावितरणच्या माहितीनुसार, ३२९ उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालत असल्याचे आरोप चुकीचे आहेत; एप्रिल २०१९ नंतर ही उपकेंद्रे खासगीकरणामध्ये आलेली नाहीत.

कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार महावितरणने(Mahavitaran) उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना केली आहे. यात दोन विभाग कार्यालये, ३७ उपविभाग आणि ३० शाखा कार्यालये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये ८७६ अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नवीन पदसंख्या वाढवण्यात आली आहे. या फेररचनेमुळे विद्यमान पदसंख्येत कपात किंवा आरक्षण व्यवस्थेत परिणाम होणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.राज्य सरकारने सांगितले की, वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने मेस्मा लागू केला आहे. संपात सहभागी झाल्यास नवीन भरती कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व नियमित कर्मचाऱ्यांना सेवेत खंड किंवा रद्द होण्याची कारवाई होऊ शकते.महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, संप काळात चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचा :
ओबीसीतील मूळ कुणबींचा मराठा आरक्षणाला विरोध….
बँक खात्यात शिल्लक नसल्यानंतरही UPI ट्रान्झॅक्शन
दिवाळीनंतर 77,000 वर येणार सोन्याचा भाव? तज्ज्ञांनी दिलाय इशारा…