मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या (treatment)व्याधीवर वेळीच इलाज करावा, संधिवात दमा या आजारांवर औषध उपचार करावे लागतील

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून रेंगाळलेले (treatment) पैसे हातात पडतील, त्यामुळे छानशी खरेदी करावीशी वाटेल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज कर्ज फेडण्यासाठी आलेल्या पैशाचा उपयोग कराल, तुमच्या अंगी असलेल्या गुणदोषांचा अंतर्मुख होऊन विचार कराल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज अनेक शंका कुशंकांच्या जाळ्यात अडकल्यामुळे, कामाची गती थोडीशी मंदावेल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायात एखादी नवीन संधी समोर आल्यामुळे, त्याबाबतीत संशोधनात्मक पवित्रा घ्याल .
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल, परंतु हे सोनेरी क्षण वेचायला तुमची बुद्धी सक्षम राहील.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या हजरजबाबी स्वभावामुळे जन मानसात चांगले स्थान मिळेल, संततीकडून थोड्या अपेक्षा भंगाचे दुःख होईल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांचा लहरीपणा वाढेल, ज्यांच्याकडे एखादी एजन्सी आहे त्यांनी त्या कामांमध्ये लक्ष घालावे.
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील, त्यासाठी किती कष्ट केले याचा हिशोब करायचा नाही.
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज एखाद्या साध्यापर्यंत पोहोचल्यामुळे मानसिक समाधानाचा आनंद घ्याल, मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ राखून ठेवा.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृती विषयी थोडी चिंता वाटेल, स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील.
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज स्वतःची हौस मौज पूर्ण कराल, विद्यार्थी आपल्या करिअरचा विचार करतील.
हेही वाचा :
३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…