यंदाच्या वर्षी साधारण पाच ते सहा महिने मुक्काम करणारा मान्सून(rain) अखेर राज्यात त्याचा प्रभाव आणि तीव्रता कमी करत परतीच्या प्रवासासाठी निघाला आहे. असं असतानाच या हवामान प्रणालीतील बदलामुळं राज्यात तापमानात चढ- उतार सुरू झाले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांसह बहुतांश भागांमध्ये उन्हाचा दाह सोसेनासा होत आहे. दुपारच्या वेळी उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवत असल्या कारणानं नागरिकांनासुद्धा या बदलांदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

शक्ती चक्रीवादळ ओसरल्यानंतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळं कोकणातील दक्षिणेकडचा भाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या(rain) सरींची अपेक्षा आहे. मात्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भाग वगळता उर्वरित राज्यातवर पावसाचं सावट नाही हेच स्पष्ट होत आहे. ज्यामुळं आता तापमानवाढ नागरिकांना बेजार करणार हे नाकारता येत नाही. राज्यात सध्या उष्णतेचं प्रमाण अधिक असणाऱ्या ठिकाणांमध्ये चंद्रपूर 34.4 अंश सेल्सिअल, नागपूर 34.1 अंश सेल्सिअस, वर्धा 34.4 अंश सेल्सिअस अशा ठिकाणांचा समावेश आहे.
राजस्थानमधून साधारण 17 सप्टेंबर रोजी मान्सूनचे वारे परतीचा प्रवास सुरू करतात. यंदा मात्र त्यांचा हा प्रवास 14 सप्टेंबरपासून सुरून झाला. पुढे हाच प्रवास रेंगाळला आणि पावसाचा मुक्काम वाढला. यंदा राज्यातही नियोजित वेळेहून पाच दिवस उशिरानं मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यामुळं आता पोषक वातावरण राहिल्यास 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघार घेण्याचा अंदाज आहे.
इथं महाराष्ट्रासह मध्य भारतामधून पाऊस माघार घेत असतानाच उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा पर्वतीय भाग इथं हिमवर्षावास सुरुवात झाली आहे. तर, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्लीतही पहाटेच्या वेळी तापमानाच घट नोंदवली जात असल्यानं हिवाळ्यानं देशाचं दार ठोठावल्याचं स्पष्ट होत आहे. आता हा हिवाळा महाराष्ट्राला कधी हुडहूडी भरवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा :
रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी…! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना
‘माझा शारीरिक छळ झाला, सहा महिन्यातच मला…’; मराठी अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा