विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक चाहते असलेला खेळाडू(crores) आहे. भारताचा हा स्टार खेळाडू इंस्टावर एक पोस्ट टाकण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतो असे म्हटले जाते. काय आहे या मागचे सत्य…

सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने खेळाच्या मैदानासह जाहीरात आणि इतर क्षेत्रातही बाजी मारली आहे. विराटची फॅन फॉलाईंग मोठी आहे. कोहली यासमयी(crores) इंस्टाग्राम सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणारा खेळाडू आहे. विराट कोहलीचे इंस्टावर 273 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विराटच्या या फॅन फॉलोईंगमुळे तो अनेक कंपन्यांचे पेड प्रोमोशन देखील करतो. यासाठी विराट कोहली याला इंस्टाग्रामवर एक पोस्ट कोलोबोरेशनसाठी कोट्यवधी रुपयांची बिदागी मिळत असते.
इंस्टावर एक पोस्ट टाकण्यासाठी विराटची फि किती ?
विराट कोहली भारतीय क्रिकेटचा फेस आयकॉन बनला आहे. भारताच्या या स्टार फलंदाजाचे चाहते संपूर्ण जगात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्याचे सुमारे 1.4 मिलियन डॉलर घेतो. भारतीय चलनात ही रक्कम 12.5 कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम आहे. विराट कोहली सोशल मीडियावर अनेक मोठ्या ब्रँडसाठी प्रमोशन करतो. यात फिलिप्स, PUMA आणि MRF टायर्स सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. तसेच इंस्टाग्राम मार्फतही प्रसिद्ध पर्सनालिटींना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी तगडी रक्कम दिली जाते. परंतू या संदर्भात विराटने कधीही त्याला एका पोस्टसाठी किती पैसे मिळतात याबद्दल सांगतलेले नाही.
विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा
विराट कोहली गेल्या सात महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता विराट ऑस्ट्रेलियाच्या विरोधात १९ ऑक्टोबरपासून वनडे सिरीजमध्ये खेळणार आहे. विराटने टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहली जेव्हा या दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळत होता, तेव्हा इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी १२ कोटी स्वीकारत होता.विराट संदर्भात दोन वर्षांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती त्यात तो सोशल मीडियातून ११ कोटी रुपये कमावतो असे म्हटले होते. रेडिटच्या बातमीनुसार विराटने एक पोस्ट शेअर करुन याचा इन्कार केला होता.
हेही वाचा :
“मोहतरमा, क्या है आपके खूबसुरती का राज?”
या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा
आजचा सोमवार राशींसाठी भाग्यशाली! दिवसाची सुरुवात होणार शुभकारक,