भारतीय क्रिकेट (cricket)संघाचा दिग्गज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिला होता. आता, पुन्हा एकदा एका नवीन बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.’रेव्हस्पोर्ट्झ’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोहलीने त्याची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) सोबतचा व्यवसाय कराराचं नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. ही बातमी कोहली कसोटी आणि टी-20 पाठोपाठ आयपीएलमधूनही निवृत्ती घेण्याचे संकेत देत असल्यची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोहली आयपीएल 2026 पूर्वी आरसीबीसोबतच्या त्याच्या करार रिन्यू करणार होता. परंतु त्याने तसे करण्यास नकार दिला आहे.इतकेच नाही तर, कोहलीने फ्रँचायझीला त्याचा चेहरा न वापरता भविष्यातील योजना आखण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे. तथापि, या प्रकरणावर अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. ना कोहलीच्या बाजूने ना आरसीबी फ्रँचायझीकडून यावर अधिकृत भाष्य करण्यात आलं आहे.

विराट कोहलीचे आरसीबीशी असलेले नाते खूप खास राहिले आहे. 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून तो या फ्रँचायझीचा भाग आहे आणि बराच काळ त्याने त्याचे नेतृत्व केले आहे.कोहलीच्या या निर्णयामुळे आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की तो हळूहळू आयपीएलपासूनही दूर जाणार आहे. ज्या दिवशी कोहली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, त्या दिवशी तो आयपीएललाही निरोप देऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे. भारत सोडून कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये स्थायिक होण्याचा विराटचा मानस आहे.

कोहलीने आयपीएल 2025 चं पर्व सुरु असतानाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.2027 च्या विश्वचषकापूर्वी त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधून(cricket) निवृत्तीच्या चर्चाही आता जोर धरु लागली आहे. कोहली आता 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दिसणार आहे, ही मालिका त्याच्या आणि रोहित शर्माच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे.

हेही वाचा :

गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, केक कापला, नंतर जे घडलं ते…

सर्वसामान्य माणूस संतप्त लोकप्रतिनिधी मात्र शांत !

दीपिका पादुकोण बनली मानसिक आरोग्याची ब्रँड अँबॅसिडर!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *