मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आरक्षण(reservation) निघणार असल्याची चर्चा असली तरी अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जाहीर केल्यामुळे याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या अधिसूचनेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका बसला आहे.

अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील 15 माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होणार आहेत तर भाजपच्या केवळ दोन माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होत आहेत. भाजपचे हे दोन्ही माजी नगरसेवक आधीच आरक्षित प्रभागातून आलेले आहेत. त्यामुळे या दोघांनाही फटका बसणार नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचाही प्रभाग आरक्षित झाला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षणाबाबत(reservation) अनेक अधिसूचना जारी केल्या आहेत. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी आरक्षण 3 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. महानगरपालिका व नगर परिषद निवडणुकांसाठी SC/ST साठी उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे. प्रत्येक प्रभागात SC/ST ची लोकसंख्येनुसार टक्केवारीनुसार आरक्षण देण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेत 227 जागांपैकी 17 जागा SC/ST साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जर प्रभाग SC/ST साठी पडला तर दोघांची टक्केवारीनुसार वाटप केली जाणार आहे. महिलांसाठी एकूण 50% राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. सामान्य आरक्षण धोरणानुसार (केंद्रीय/राज्य पातळीवर) महाराष्ट्रात SC साठी 13%, ST साठी 7% आरक्षण कायम (शिक्षण, नोकरी व निवडणुकांसाठी). अनुसूचित जमातींची यादी 47 जातींची असून, शेवटची सुधारणा 2003 मध्ये झाली आहे.

मुंबईत अनुसूचित जातींसाठी 15 तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव असतील, या 17 जागांपैकी 15 जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे माजी नगरसेवक आहेत तरकेवळ दोन जागा अशा आहेत जिथे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पाच काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांपैकी गंगा माने यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा :
जिओची सुपरहिट ऑफर….
सापलाही लागली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहण्याची सवय; मजेदार Video Viral…
पट्टणकोडोलीत फरांडे बाबांची भाकणूक जाहीर…