रिचार्ज प्लॅनच्या(plans) वाढत्या किमतींमुळे मोबाईल यूजर्समध्ये, विशेषतः ड्युअल सिम वापरणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महिन्याला किंवा तिमाहीला दोन नंबर रिचार्ज करण्याचा खर्च वाढल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे. अशा पार्श्वभूमीवर देशातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी जिओने ग्राहकांना दिलासा देत दीर्घ वैधतेचा नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे — ज्याची वैधता तब्बल ११ महिने (३३६ दिवस) इतकी आहे.

जिओने आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेहमीप्रमाणे सर्व प्रकारच्या योजना — स्वस्त ते प्रीमियम — ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा अनेक प्लॅनचे (plans)दर वाढले असले तरी, काही परवडणाऱ्या व दीर्घकालीन योजना अजूनही उपलब्ध आहेत, ज्यामुळे वारंवार रिचार्ज टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळतो.
जिओचे दीर्घ वैधतेचे प्रमुख प्लॅन्स
₹448 प्लॅन (84 दिवस वैधता)
अमर्यादित कॉलिंग
1000 SMS
मोफत प्रवेश: JioTV, JioCloud
डेटा नाही (फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी)
₹1234 प्लॅन (336 दिवस वैधता)
तब्बल ११ महिन्यांची वैधता
अमर्यादित कॉलिंग + 3600 SMS
JioTV आणि JioCloud सेवांचा मोफत लाभ
इंटरनेट डेटा समाविष्ट नाही
₹895 प्लॅन (336 दिवस वैधता)
विद्यमान जिओ ग्राहकांसाठी
कॉलिंग, SMS आणि डेटा तिन्ही सुविधा
वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळून एकदाच दीर्घ वैधतेचा प्लॅन घेणं फायदेशीर ठरू शकतं. वाढत्या रिचार्ज दरांच्या पार्श्वभूमीवर जिओचे हे प्लॅन्स बजेट नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सतत कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
हेही वाचा :
सापलाही लागली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहण्याची सवय; मजेदार Video Viral…
पट्टणकोडोलीत फरांडे बाबांची भाकणूक जाहीर…
लांब आणि घनदाट केसांसाठी हे जादूई तेल ठरेल फायदेशीर..