बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता (actor)सलमान खानची माजी प्रेयसी संगीता बिजलानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे, तर सुरक्षेच्या कारणामुळे ती चर्चेत आहे. संगीताने खुलासा केला आहे की, तिला आता स्वतःच्या घरातही सुरक्षित वाटत नाही. यामागे कारण आहे चार महिन्यांपूर्वी तिच्या पवना येथील फार्महाऊसमध्ये झालेली चोरी. या घटनेनंतरही अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नसल्याने अभिनेत्री चिंतेत आहे.

जुलै महिन्यात काही अज्ञात व्यक्तींनी संगीताच्या फार्महाऊसमध्ये घुसून तोडफोड आणि चोरीची घटना घडवली. चोरट्यांनी रेफ्रिजरेटर, टीव्ही, फर्निचरचे नुकसान केले आणि घराच्या भिंतींवर अश्लील शब्द लिहून ठेवले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी ₹50,000 रोकड आणि ₹7,000 किंमतीचा टीव्ही लंपास केला. या घटनेबद्दल बोलताना संगीता म्हणाली, “मी गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी राहते. पवना माझं दुसरं घर आहे. पण या भयानक घटनेनंतर साडेतीन महिने उलटले, तरी तपासात काहीही प्रगती नाही. आता मला स्वतःच्या घरातसुद्धा भीती वाटते.”

अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, “त्या रात्री मी तेथे नव्हते, हे माझं नशीब होतं. पण घरातील भिंतींवर जे लिहिलं होतं, ते पाहून मन हादरलं. सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि या घटनेनंतर पवना परिसरातील अनेक रहिवासी घाबरले आहेत.”

या भीषण अनुभवामुळे संगीताने पुणे ग्रामीण पोलिसांकडे (actor)शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे. ती म्हणाली, “एक महिला म्हणून, जर मी एकटीने घरी जात असेन तर माझ्याकडे स्वतःचं संरक्षण असणं आवश्यक आहे. मला याआधी कधीही शस्त्र परवान्याची गरज वाटली नव्हती, पण आता असुरक्षित वाटतं.”

संगीता बिजलानी ही एकेकाळी सलमान खानची जवळची मैत्रीण आणि माजी प्रेयसी होती. दोघांचे नाते बराच काळ चर्चेत होते आणि त्यांचं लग्न ठरल्याच्या अफवाही होत्या. दोघांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या, मात्र काही कारणांमुळे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर संगीताने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याच्याशी विवाह केला. सध्या ती पवना येथील आपल्या फार्महाऊसमध्ये राहत असली तरी या घटनेनंतर तिच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून परिसरातील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

आज तुमचं भविष्य काय सांगतं…..

Raj Kumar Rao ने खरेदी केली ‘ही’ आलिशान कार, किंमत तब्बल 2.15 कोटी

ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *