यंदा भारताचा 79 व्या स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. भारत (celebrating)हा सुरुवातीपासूनच समृद्ध आणि संपन्न देश आहे. यामुळेच इंग्रजांनी भारताला लक्ष्य केले आणि येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्रजांनी जवळपास 200 वर्षे भारतावर राज्य केलं. भारत आणि भारतीयांना इंग्रजांनी आपले गुलाम केले होते. इंग्रजांचे नियम, कायदे या सगळ्या गोष्टी भारतात लागू करण्यात आल्या होत्या. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकजण हुतात्मा झाले. यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. हा सर्व इतिहासात सर्वांनाच माहिती आहे. मात्र, भारतातील एक राज्य असे होते जे कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नाही. जाणून घेऊया हे राज्य कोणेत?

इंग्रजाचे गुलाम न होणाऱ्या राज्याविषयी जाणून घेण्याआधी (celebrating)भारतातील सर्व राज्यांची माहिती जाणून घेऊया. भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 24 ऑगस्ट 1608 रोजी व्यापाराच्या उद्देशाने इंग्रज भारतात पहिल्यांदा सुरतलाआले. त्यांना इथे व्यवसाय करून भारतीय रुपये हडप करायचे होते.
इथली संसाधने आपल्या देशात घेऊन जायची होती. 1615 मध्ये ब्रिटिशांनी थॉमस रॉ यांना जहांगीरच्या दरबारात आपला राजदूत म्हणून पाठवला, त्यानंतर ब्रिटिशांना भारतात व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतात प्रवेश मिळवला. यानंतर हळूहळू इंग्रजांनी भारताचा ताबा घेण्यास सुरुवात केली.
भारतात एक असे राज्य होते ज्याला इंग्रस कधीच आपला गुलाम बनवू शकले नाहीत. कारण, इंग्रजांच्या आधी पोर्तुगीज भारतात पोचले होते. या राज्यात पोर्तुगीज असल्यामुळे इंग्रजांना या राज्यात शिरकाव करता आला नाही. या राज्याचे नाव आहे गोवा. 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या कालिकत किनाऱ्यावर पोहोचला होता. इंग्रजांना गोवा या राज्यावर कधीच राज्य करता आले नाही.या काळात इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात अनेक युद्धेही झाली. तथापि, गोवा राज्य कधीही ब्रिटिशांच्या ताब्यात राहिले नाही. त्याच वेळी, पोर्तुगीज हे एकमेव परदेशी आहेत जे भारतात प्रथम आले आणि शेवटी गेले. ते सुमारे 400 वर्षे भारतात राहिले.
हेही वाचा :
Vinfast आणणार Nano पेक्षाही सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार, MG Comet चे टेन्शन वाढणार
आजचा गुरूवारचा दिवस राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य वाचा
भारत साजरा करतोय 79 वा स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या यामागील इतिहास, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत