कोल्हापूर शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. साळुंखे पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने एका नराधम मुलाने स्वतःच्या आईचा(mother) वरवंटा डोक्यात घालून खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) असे असून, आरोपी मुलगा विजय निकम याला राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विजय दारूच्या आहारी गेला होता आणि वारंवार आईकडे पैशांची मागणी करत असे. मात्र, आईने(mother) पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या विजयने घरातील वरवंटा उचलून सावित्रीबाईंच्या डोक्यात मारहाण केली.

या हल्ल्यात सावित्रीबाई गंभीर जखमी झाल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाकडे पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. काही क्षणांतच परिसरात लोकांची मोठी गर्दी जमली.

घटनास्थळी राजारामपुरी पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजते. या भीषण घटनेमुळे कोल्हापूरमध्ये हळहळ व्यक्त होत असून, “दारूचे व्यसन किती भयानक ठरू शकते” याचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे.पोलिस तपास सुरू असून, आरोपी विजय निकमविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

‘भूत कोला’ पण सण देवाचा…

वेळीच सावध होऊन घ्या उपचार

आजचा बुधवार राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने अडचणी होतील दूर,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *