मुंबई जवळच्या डोंबिवलीतून एक संतापजनक(shocking) घटना समोर आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी अन् आरोपी एकाच घरात राहत असल्याचे समजतेय. मुलगी भांडी घासत होती, त्यावेळी आरोपीने दाराची कडी लावली अन् तिच्यासोबत नको ते केले. या लज्जास्पद कृत्याला मुलीने विरोध केला अन् स्वत:ची सुटका केली. पण तरीही नराधमाने तिला सोडले नाही. त्याने तिला पकडले अन् विनंयभंग केला. मुलीने कशीबशी आपली सुटका केली अन् घडलेला प्रसंग आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

हा धक्कादायक प्रसंग डोंबिवलीजवळच्या आयरे या गावात झाला आहे. आरोपीचे नाव इकबाल नन्हेबक्ष अन्सारी असे आहे. ३७ वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इकबाल हा उत्तर प्रदेशमधील बरेली येथील मूळचा आहे. तो कामासाठी डोंबिवलीत आला. तो आणि पीडित मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. आरोपी हा पीडित मुलीच्या कुटुंबासोबत एकाच(shocking) घरात राहत होते. मुलीला एकटीला पाहून आरोपीने लाजीरवणं कृत्य केलेय. रामनगर पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर १६ वर्षाची मुलगी घरातील काम आटोपून भांडी घासत होती. त्यावेळी घरातच आराम करत असलेल्या इकबालची नजर फिरली. त्याने दाराला कडी लावली अन् मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलीने इकबालला विरोध करत आपली सुटका केली अन् धावत निघाली. पण इकबालने पुन्हा तिला पकडले अन् विनयभंग केला. इकबाल याला मुलीने पुन्हा विरोध करत जोरात लाथ मारली अन् कडी उघडून घराबाहेर पळ काढला.

मुलीने आपल्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग आई आणि वडिलांना सांगितला. घरातच राहणाऱ्या इकबालने हे काळं कृत्य केल्याने मुलीच्या आई-वडिलांच्या पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तात्काळ रामनगर पोलिसांत धाव घेत इकबालच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी इकबाल याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू केला. रामनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला घरातून तात्काळ अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून या घटनेचा आणखी तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा :

HSRP नंबर प्लेट अद्यापही लावली नाही? ही माहिती तुमच्याचसाठी…

राजकारणात मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदेंचा डबल धमाका….

प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *