महिला(Women) आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत — मग तो शिक्षण, व्यवसाय किंवा सामाजिक कार्य असो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे — ‘पंचायत समिती शिलाई मशिन योजना’.

या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशिन खरेदीसाठी तब्बल ९० टक्के अनुदान मिळणार आहे, तर फक्त १० टक्के रक्कम महिलांना स्वतः भरावी लागेल. त्यामुळे शिवणकाम सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांवर आर्थिक ओझे पडणार नाही. या योजनेमुळे ग्रामीण महिलांना घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करता येईल आणि त्यातून उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. त्यामुळे महिला अधिक स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होऊ शकतील.
या योजनेचा लाभ शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या महिलांना प्राधान्याने दिला जाणार आहे. यासाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत अर्जदार महिला(Women) महाराष्ट्राची रहिवासी असावी, २० ते ४० वयोगटातील असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, तसेच ती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावी. याशिवाय अर्जदार महिलेकडे रेशन कार्ड आणि शिवणकाम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी इच्छुक महिलांनी आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि विधवा किंवा अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास) ही कागदपत्रे सादर करावी लागतील.

राज्य सरकारची ही योजना ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल मानली जात आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
HSRP नंबर प्लेट अद्यापही लावली नाही? ही माहिती तुमच्याचसाठी…
राजकारणात मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदेंचा डबल धमाका….
प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग…