स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) मोठी उलथापालथ झाली आहे. जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यांतील दोन प्रभावी माजी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेची ताकद मात्र वाढली आहे.

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात(politics) खळबळ उडाली असून, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही निवडणुकांपासून त्यांचा भाजपला पाठिंबा होता, त्यामुळे त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
चौधरी यांच्यासोबतच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक गुलाब पाटील , माजी शहरप्रमुख प्रवीण पाठक , माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी , देविदास महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा घेतला आहे, ज्यामुळे अमळनेरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

दुसरीकडे, हिंगोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार हरीभाऊ पाटील गोरेगावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर आणि इतर अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले , जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा…
दिवाळी पहाटेला दिसा नक्षत्रासारख्या देखण्या!
लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स,