वाहनधारक आणि त्यातही जुन्या वाहनांची मालकी असणाऱ्या सर्वच मंडळींसाठी प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी एक नवा नियम लागू केला. ज्या नियमाअंतर्गत जुनी वाहनं असणाऱ्या वाहनधारकांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमान्वये(rule) ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ लावणं बंधनकारक होतं. यासाठीची काळमर्यादासुद्धा प्रशासनानं निर्धारित केली होती. ज्यानुसार नोव्हेंबर महिना या प्रक्रियेसाठी अखेरचा महिना होता. आता मात्र चौथ्या वेळेस ही अंतिम तारीख आणखी पुढं गेली असून, या प्रक्रियेला चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.

अद्यापही असे कैक वाहनधारक आहेत ज्यांना ही नंबर प्लेट बसवता आलेली नाही. अशा नागरिकांना प्रवासात अडचणी येऊ नयेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात (rule)आला आहे. सततची मुदतवाढ पाहता राज्यातील असंख्य वाहनधारकांनी अद्यापही ही नव्या तंत्रज्ञानाची HSRP नंबर प्लेट बसवली नसल्याचं स्पष्टच होत आहे. नोंदणीसाठी असणारी गर्दी, अपेक्षित वेळात तारीख न मिळणं, सर्व्हर डाऊन असणं अशा अनेक अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागत असल्या कारणानंच ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
राज्य परिवहन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार ही नंबर प्लेट अतीव महत्त्वाची असून, ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात येणार नाही, त्यांच्यासाठी RTO कार्यालयाशी संलग्न कामांमध्ये अडथळे येतील. याशिवाय होणारे परिणाम खालीलप्रमाणे….
कर्ज नोंदणी- जुन्हा वाहनांसाठीच्या कर्जाची नोंदणी करठणं किवा काढणं अशी कामं रखडतील. परवाना नुतनीकरण होणार नाही- खासगी, व्यावसायिक वाहनांचा परवाना नुतनीकरणात अडचणी पत्ता बदण्यात अडचणी- वाहनांच्या नोंदणीवर असणारा पत्ता बदलता येणार नाही हस्तांतरण – वाहनांचं मालकी हस्तांतरण अर्थात वाहन दुसऱ्याच्या नावावर करता येणार नाही.
हेही वाचा :
कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा…
दिवाळी पहाटेला दिसा नक्षत्रासारख्या देखण्या!
लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स,