भारतीय क्रिकेट संघ बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेत चाहत्यांसाठी विशेष आकर्षण म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली ७ महिन्यांनंतर एकत्र मैदानात खेळताना दिसणार(chance) आहेत.दरम्यान, रोहितला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून, त्याऐवजी शुभमन गिलला कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आणि विराट या दोघांच्या भवितव्याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बोलताना म्हटले की, “गेल्या १५ वर्षात जवळपास प्रत्येक भारतीय संघात विराट आणि रोहित खेळले आहेत. त्यामुळे कदाचित ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी त्यांना खेळताना पाहण्याची ही शेवटची संधी आहे.” कमिन्सने २०२३ वनडे वर्ल्ड कप विजेतेपदाच्या आठवणी उजळल्या आणि भारताच्या या दोन चॅम्पियन खेळाडूंविषयी आदर व्यक्त केला.
कमिन्स सध्या पाठिच्या दुखापतीतून सावरत असून, भारताविरुद्धच्या आगामी मालिकेत खेळणार नाही. त्याच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करणार आहे. कमिन्सने याबाबत(chance) नाराजी व्यक्त करत सांगितले, “भारताविरुद्ध खेळता न येणे निराशाजनक आहे, कारण प्रेक्षकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे.”शिवाय कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या आगामी धोरणांबाबत सांगितले की, जवळच्या वर्ल्ड कपसाठी युवा खेळाडूंना संधी देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून योग्य संघाची निवड करता येईल.या मालिकेतील रोहित-विराट यांची अंतिम वनडे झलक आणि युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करण्याची ऑस्ट्रेलियाची योजना, दोन्ही कारणांमुळे ही मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
हेही वाचा :
सांगलीतील ४७ तोळ्यांच्या चोरीचा छडा उघड…
पंकज धीर यांनी 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….
मृत्यूनंतर कोण कोण येणार हे पाहण्यासाठी व्यक्तीने जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा…