राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ निवडणूक(Election) आयोगाशी भेटले असून, मतदार याद्यांमधील गोंधळ, दुबार नावे आणि त्रुटी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकापसह इतर पक्षांच्या नेते उपस्थित होते.शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करत म्हटले की, जोपर्यंत मतदार यादीतील गडबड दूर होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले की, “लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून मतदार याद्यांमध्ये हस्तक्षेप होत असल्याची माहिती आम्ही आयोगाकडे दिली आहे.”

शिष्टमंडळाचा आरोप आहे की, काही ठिकाणी 200-200 लोकांची नावे चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेली, तसेच काही मतदारांना मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतर दिला जात आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाहीच्या नावाखाली आयोग हुकूमशाही गाजवत असल्यास आम्ही ते मान्य करणार नाही.”आयोगाकडून ईव्हीएम वापर आणि व्हीव्हीपॅट रेकॉर्डिंगसंबंधी उपाययोजना नाकारल्याची चिंता शिष्टमंडळाने व्यक्त केली. महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवर होणार असून व्हिडीओ रेकॉर्डिंग दिलं जाणार नाही, असा आक्षेप त्यांनी व्यक्त केला.
शिष्टमंडळाने ठामपणे सांगितले की, निवडणुका(Election) निष्पक्षपणे झाल्याशिवाय त्यांना मान्यता दिली जाणार नाही. राज्य निवडणूक आयोगाशी भेटीमुळे या प्रकरणाला राजकीय आणि प्रशासनिक पातळीवर गंभीर लक्ष दिलं जाणार आहे.
हेही वाचा :
सांगलीतील ४७ तोळ्यांच्या चोरीचा छडा उघड…
पंकज धीर यांनी 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….
मृत्यूनंतर कोण कोण येणार हे पाहण्यासाठी व्यक्तीने जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा…