आशिया कप २०२५ स्पर्धाला ९ सप्टेंबरपासून सुरवात(tournament) होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे मत टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ताने व्यक्त केले.

भारत नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला आहे. भारतीय कसोटी (tournament) संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत युवा कर्मधार शुभमन गिलच्या भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ ९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया कप २०२५ च्या तयारीला लागला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून २६ जुलै रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यूएईमध्ये ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. अद्याप या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच त्याआधी टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ताकडून एकी विधान करण्यात आले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाने भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला आशिया कपमध्ये संधी नाकारली जाणार आहे.

भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसन टी २० क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताकडून खेळताना वर्षभरात टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संजू सॅमसन हा एकमेव फलंदाज आहे. मात या मध्ये एक नकोशी बाब आहे की, संजूने गेल्या ५ टी २० सामन्यांमध्ये ५१ धावा केल्या आहेत. त्यामुळे संजूला आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान देण्याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.

दीप दासगुप्ता नेमकं काय म्हणाला?
दीप दासगुप्ता आशिया कपमधील संघाबाबत बोलताना म्हटला की “संजू सॅमसन याने चांगली कामगिरी केलीय साली तरी भारतात इंग्लंड विरुद्ध त्याला धावांसाठी फार संघर्ष करावा लागला होता. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली कोणत्याही एका बळकट संघाविरुद्ध खेळलेली ही एकमेव मालिका होती.”

दीप दासगुप्ता पुढे म्हणाला की, “शुबमन गिल हा विराट कोहलीची भूमिका उत्तम बजावू शकतो. शुबमन या अशा स्पर्धेत शेवटपर्यंत खेळून मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम आहे. शुबमनला आयपीएलमधील कामगिरीचा फायदा होईल. तसेच यूएईमधील संथ खेळपट्टीत अशा खेळाडूची गरज आहे.”

अभिषेक शर्माने सलामीवीर म्हणून खेळावं
दीप दासगुप्ता सालामीवीरांबाबत बोलताना म्हणाला की, “अभिषेक शर्मा याने ओपनर म्हणून मैदानात उतराव. अभिषेकमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. मात्र यावेळी यशस्वी जैस्वालला संधी मिळणं अवघड आहे. त्यामुळे निवड समितीला संजू सॅमसन आणि जितेश शर्मा मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतात की नाही, हे निश्चित करावं लागणार आहे.”

असा असेल आशिया कप 2025 साठी भारताचा संभाव्य संघ
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी, झटपट घरच्या घरी बनवा पनीर कॉर्न बॉल
फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट
अर्जुन तेंडुलकरची होणारी नवरी, सानिया चांडोक काय काम करते? आहे बड्या उद्योगपतीची मुलगी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *