सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि(Breakfast) चविष्टपणे करणारा असावा. जर तुम्ही काही नवीन, चटपटीत आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीच्या शोधात असाल, तर पनीर कॉर्न बॉल हा एक उत्तम पर्याय आहे! हे पनीर कॉर्न बॉल चविष्ट, पौष्टिक आणि बनवायला अत्यंत सोपे आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे बॉल्स खूप आवडतात. पनीरमधील प्रथिने आणि कॉर्नमधील फायबर यामुळे हा नाश्ता केवळ स्वादिष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. खमंग चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह केल्यास याची चव आणखी खुलते. ही रेसिपी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याने सहज तयार करता येते. सकाळच्या घाईगडबडीतही तुम्ही हे झटपट बनवू शकता आणि कुटुंबाला आनंदी करू शकता. पनीर कॉर्न बॉल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

पनीर कॉर्न बॉल (Breakfast)बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१/२ कप भाजलेले मखाना
१/२ कप रवा
२ टेबलस्पून दही
२ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून आले पेस्ट
१०० ग्रॅम कुरकुरीत पनीर
१ टीस्पून मीठ (चवीनुसार)
२/३ टीस्पून काळी मिरी पावडर
१/२ टीस्पून चाट मसाला
१/३ कप पाणी
१/३ कप बारीक चिरलेला कॉर्न
१/३ कप बारीक चिरलेला कांदा
१/३ कप चिरलेली सिमला मिरची
२/३ टीस्पून बेकिंग सोडा
पनीर कॉर्न बॉल बनवण्याची कृती
पनीर कॉर्न बॉल बनव सर्वात आधी मखाना बारीक करून त्यात रवा मिसळा. नंतर दही, हिरवी मिरची, आलं, पनीर, मीठ,काळी मिरी, चाट मसाला,पाणी घालून चांगले मिसळा. नंतर स्वीट कॉर्न, बारीक कांदा, शिमला मिरची,बेकिंग सोडा मिसळा. नंतर अप्पे पात्रात हे सारण टाका. आणि चांगले भाजून घ्यावे. पनीर कॉर्न बॉल तयार आहेत.
हेही वाचा :
दहीहंडीचा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणामागील इतिहास
जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये या ठिकाणी ठेवा मोरपंख, कुटुंबामध्ये राहील आनंदाचे वातावरण
नवीन क्रीडा विधेयकामुळे बीसीसीआय अध्यक्षांची लागली लॉटरी! सप्टेंबरपर्यंत रॉजर बिन्नी राहणार पदावर