अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या एंगेजमेंटच्या (engagement)बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सानिया चांडोक ही मुंबईतील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. तिचे वडील आणि आजोबा यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, परंतु सानिया चांडोक काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकच्या साखरपुड्याच्या(engagement) चर्चेने सोशल मीडियावर चांगलीच धूम उडवली आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात सानिया, ऐश्वर्यसंपन्न कुटुंबातून येते.
तिचे वडील आणि आजोबा यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, परंतु सानिया चांडोक काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
खानपान व्यवसायात घई परिवाराची मजबूत पकड असून, लोकप्रिय ‘ब्रुकलिन क्रीमरी’सह अनेक मोठे ब्रँड त्यांच्या मालकीचे आहेत.
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन सध्या क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे, सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे.
ती ‘मिस्टर पॉज’ नावाच्या प्रीमियम पेट सैलून, स्पा आणि स्टोअरची संस्थापक आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि सानिया हे बालपणापासूनचे मित्र आहेत. सारा तेंडुलकरदेखील सानियाला इंस्टाग्रामवर फॉलो करते.
सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असून, त्यांची संपत्ती तब्बल 1500 कोटींच्या आसपास असल्याचं मानलं जातं. तर सानिया चंडोकचा घई परिवारदेखील कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
ऐश्वर्यसंपन्न पार्श्वभूमी असलेल्या या दोघांचा संसार आता रंगणार आहे, आणि चाहते त्यांना ‘पर्फेक्ट कपल’ म्हणून आतापासूनच बघत आहेत.
हेही वाचा :
दहीहंडीचा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणामागील इतिहास
जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये या ठिकाणी ठेवा मोरपंख, कुटुंबामध्ये राहील आनंदाचे वातावरण
नवीन क्रीडा विधेयकामुळे बीसीसीआय अध्यक्षांची लागली लॉटरी! सप्टेंबरपर्यंत रॉजर बिन्नी राहणार पदावर