अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडचा रामराम ठोकलेली व दंगल फेम अभिनेत्री (actress)जायरा वसीम हिने लग्नगाठ बांधली आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट करत तिने ही बातमी आनंदाची बातमी शेअर केली आहे. जायराने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत ती निकाहनामावर सही करत आहे. तर दुसऱ्या फोटात पतीसोबत चंद्र पाहत आहे.

जायराने अद्याप तिच्या पतीचे नाव आणि ओळख उघडकीस आणली नाहीये. सध्या शेअर केलेल्या दोन्ही फोटोत तिच्या पतीचा चेहरा दिसत नाहीये. लग्नाच्या या खास दिवशी जायराने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसंच, फोटोला कॅप्शन देत कुबूल है असं म्हटलं आहे. जायराच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
जायरा वसीमने 2019मध्ये बॉलिवूडला राम राम केला होता. तिच्या या निर्णयामागे अनेक कारण असल्याचे सांगितले जाते. तिने म्हटलं होतं की, ती तिच्या कामाबाबत आनंदी नाहीये. तसंच, धर्माचा हवाला देत ती ग्लॅमर वर्ल्डपासून दूर झाली होती. जायराने पोस्ट करत म्हटलं होतं की, 5 वर्षांपूर्वी मी एक निर्णय (actress)घेतला होता. त्या निर्णयाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच प्रसिद्ध होण्याचे अनेक मार्ग खुले झाले. मला लोकांचे अटेंशन मिळू लागले. अनेकदा युवकांचे रोल मॉडेल म्हणूनही पाहिलं गेलं. पण मला हे सगळं नको होतं, असं तिने म्हटलं आहे.

दंगल चित्रपटासाठी जायराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने आमिर खानसोबत आणखी एक चित्रपट केला होता. सिक्रेट सुपरस्टार. त्यानंतर ती प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या द स्काय इज पिंक चित्रपटातदेखील दिसली होती. तिच्या अभिनयासाठी तिचे अनेकदा कौतुकही झाले आहे. जायराने 2019 साली बॉलिवूड इंडस्ट्री सोडली होती.
हेही वाचा :
“भुजबळांची ‘अक्कल दाढ’ पडली, बुद्धी गेली…”; जरांगे पाटलांचं भुजबळांना जहाल प्रत्युत्तर!
आज धनत्रयोदशीला या राशींना मिळणार लाभ…
अपराजिताच्या फूलाचे आरोग्यदायी रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…!