दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन, जो यावर्षी २१ ऑक्टोबर, मंगळवार रोजी अश्विन अमावस्येला साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराघरांत स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी, बुद्धी आणि शुभ-लाभासाठी गणेश, तसेच धनाचे रक्षण करणारे कुबेर यांच्या विधिवत पूजा केली जाते. लोकांच्या श्रद्धेनुसार, लक्ष्मी पूजनाच्या रात्री माता लक्ष्मी स्वच्छ घरांमध्ये प्रवेश करतात आणि जे भक्त तिचे स्वागत करतात, त्यांच्या घरात दीर्घकाळ सुख-समृद्धी वास करते. लक्ष्मी पूजनाचा (Lakshmi Puja)मुख्य उद्देश घरात धन, ऐश्वर्य, आरोग्य, यश आणि मानसिक शांती टिकवणे हा आहे.

पूजेच्या तयारीसाठी घर पूर्णपणे स्वच्छ करावे, पाटावर लाल वस्त्र पसरावे आणि त्यावर लक्ष्मी व गणेशाची मूर्ती ठेवावी. मूर्तीजवळ तांब्याचा कलश ठेवून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. पूजेला संकल्प करून प्रथम भगवान गणेशाची पूजा करून दुर्वा, मोदक अथवा मिठाई अर्पण करावी. त्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून हळद-कुंकू, अक्षता, कमळाचे फूल आणि कमलगट्टा अर्पण करावे. पूजा करताना ‘ॐ महालक्ष्म्यै नमः’ अथवा ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
नैवेद्य अर्पण केल्यानंतर मूर्तीसमोर पैसा, दागिने, नवीन वस्तू ठेवाव्यात आणि शेवटी लक्ष्मी व गणपतीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा. घरात नंदादीप प्रज्वलित करून दिवाळीच्या(Lakshmi Puja) सणात प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. यावर्षी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५.३२ वाजल्यापासून रात्री ८.१६ वाजेपर्यंत आहे, जो स्थानिक पंचांगानुसार थोडा बदलू शकतो. या दिवशी विधिवत पूजा केल्यास घरात समृद्धी, धन आणि सुख-शांती टिकून राहण्याची शक्यता अधिक असते.
हेही वाचा :
कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…
पुढच्या वर्षी सोनं किती महागणार? काय असेल रेट? बाबा वेंगाची थक्क करणारी भविष्यवाणी काय?
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी