या वर्षीची दिवाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसाठी खूप खास असणार आहे. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरची पहिली दिवाळी साजरी(celebrated) केली. कियाराने तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत एक खास दिवाळी व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांच्या सेलिब्रेशनची झलक दिसली आहे.

कियारा अडवाणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये, कियारा आणि सिद्धार्थ पिवळ्या रंगाच्या मॅचिंग पोशाखात दिसले. अभिनेत्रीने सुंदर नक्षी काम असलेला पिवळा अनारकली सूट घातला होता. ज्यावर गुलाबी बॉर्डर पिवळ्या दुपट्ट्यासह जोडला होता. कियाराने तिचा दिवाळी लूक अत्यंत साधेपणाने स्टाइल केला होता. मोकळे केस, एक छोटी लाल टिकली, साधा मेकअप या सगळ्यामुळे तिचा लुक परिपूर्ण दिसत होता.
दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्राने अभिनेत्रीला मॅचिंग असा कुर्ता आणि पांढरा पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता. व्हिडिओमध्ये, दोघेही खूप आनंदी दिसत आहेत आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “दिवाळीच्या शुभेच्छा, प्रेम, प्रकाश आणि सूर्यप्रकाश.” हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे(celebrated). चाहते कमेंट सेक्शनमध्ये कियाराच्या गर्भधारणेनंतरच्या सौंदर्याचे आणि जोडप्याच्या हृदयस्पर्शी केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत. चाहते या पोस्टवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
मुलीच्या जन्मानंतर मातृत्वाचा आनंद लुटणारी कियारा अलीकडेच मुंबई विमानतळावर पती सिद्धार्थ आणि मुलीसोबत दिसली. या जोडप्याच्या छोट्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सर्वांमध्ये, सिद्धार्थने अलीकडेच द कपिल शर्मा शोमध्ये पितृत्वाबद्दल उघडपणे सांगितले की, “आमचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आहे… खाण्यापिण्यापासून ते तिच्या झोपण्याच्या पद्धतींपर्यंत. आम्ही आता उशिरापर्यंत जागी राहतो, पण हा एक वेगळ्या प्रकारचा थकवा आहे.”
हेही वाचा :
लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral
35 वर्षांची वहिनी 19 वर्षाच्या दीराच्या प्रेमात,मग जंगलात जाऊन तिथे…
२० रुपयांच्या ‘या’ पदार्थामुळे होतील काळेभोर सुंदर केस