दाक्षिणात्य (South Indian)चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी कारण आहे तिचा आणि अभिनेता विजय देवरकोंडाचा साखरपुडा! काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर चाहत्यांना तिच्या प्रतिक्रियेची उत्सुकता लागली होती. अखेर आता रश्मिकाने या चर्चेबद्दल पहिल्यांदाच भाष्य करत, “खूप काही घडतंय…” असं म्हणत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘थामा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार असून हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच ती ‘थामा’च्या प्रमोशनल कार्यक्रमात पोहोचली असता, चाहत्यांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी तिचं अभिनंदन केलं. हे ऐकून अभिनेत्री लाजली आणि म्हणाली, “मी तुमच्या शुभेच्छा स्वीकारते.” त्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर(South Indian) प्रचंड व्हायरल झाला आहे.
यानंतर रश्मिकाने एका या माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत या चर्चांवर भाष्य केलं. मुलाखतीदरम्यान होस्टने तिला अभिनंदन केलं, तेव्हा रश्मिकाला सुरुवातीला धक्का बसला. नंतर होस्टने सांगितलं की तो तिच्या नवीन परफ्यूम ब्रँडसाठी अभिनंदन करत आहे. पण त्यावर रश्मिका म्हणाली, “खरं तर, खूप काही घडतंय. म्हणून मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारते…” या विधानानंतर चाहत्यांनी या प्रतिक्रियेला साखरपुड्याची अप्रत्यक्ष कबुली मानली.
रश्मिका आणि विजय देवरकोंडाने एकत्र पहिल्यांदा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात काम केलं. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली. त्यानंतर या जोडीने ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात एकत्र काम केलं आणि दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, अशी चर्चा रंगली. साखरपुड्याच्या अफवांना बळ मिळालं तेव्हा, विजय देवरकोंडाच्या बोटात अंगठी दिसली आणि काही दिवसांनंतर रश्मिकाने तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी असलेला व्हिडिओ शेअर केला.
त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या साखरपुड्याची खात्री पटली. जरी दोघांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम अनेक प्रसंगी झळकत असल्याचं दिसतं. रश्मिका मंदाना सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ‘थामा’ व्यतिरिक्त ती ‘पुष्पा-२’, ‘कुबेरा’, ‘छावा’, ‘सिकंदर’ आणि ‘गुड बाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिच्या ‘पुष्पा’ आणि ‘अॅनिमल’ या सिनेमांनी तिला पॅन-इंडिया स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. अभिनयासोबतच ती ब्रँड अॅम्बेसेडर आणि व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकत आहे.

त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालीकडे चाहत्यांचे लक्ष आहे. रश्मिकाने जरी साखरपुड्याबद्दल थेट कबुली दिली नसली तरी तिच्या “खूप काही घडतंय…” या उत्तराने चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. आता ती आणि विजय देवरकोंडा यांचं पुढचं पाऊल काय असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हेही वाचा :
१० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा,
Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल!
भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या,