अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान सोसाव्या लागलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी (farmers)राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी सात जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असून, यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळणार आहे.

गेल्या महिन्यात, सप्टेंबर २०२५ मध्ये, मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, ज्यामुळे शेतकरी(farmers) वर्ग आर्थिक संकटात सापडला होता. शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली होती.
या नुकसानीची दखल घेत, राज्य सरकारने तातडीने मदतीची घोषणा केली आहे. सोमवार, २० ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. या आदेशानुसार, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकूण ३३ कोटी ६३ लाख ९० हजार रुपयांची (₹3363.90 लाख) मदत मंजूर करण्यात आली आहे.
शासनाने मंजूर केलेली ही मदत मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमधील एकूण ३ लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या मदतीअंतर्गत एकूण ३ लाख ८८ हजार १०७ हेक्टर बाधित शेतजमीन समाविष्ट आहे. ही मदत शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मदतीची रक्कम धनादेशाद्वारे किंवा थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे विभागीय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी..
लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral
35 वर्षांची वहिनी 19 वर्षाच्या दीराच्या प्रेमात,मग जंगलात जाऊन तिथे…