राज्यातील बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता (good news)आली आहे. माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत या भाऊबीजाला बहिणींच्या खात्यात थेट सन्मान निधी जमा केला जाणार आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना ₹1,500 मिळायचा, पण यंदा ₹2,100 पर्यंत वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता बळावली आहे.

मंत्री नरहरी झिरवल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना 21 ते 65 वर्षे वयातील महिलांना आर्थिक मदत पुरवते आणि राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना त्याचा लाभ मिळतो. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले गेले आहे, आणि त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मंत्री झिरवल यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सभेत सांगितले की, गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा विचार आहे, ज्यामुळे बहिणींना आणखी(good news) मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. याच वेळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना व्यावसायिक कर्ज पुरवठा देखील सुरू झाला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेतून 57 महिलांना कर्ज वितरण केले गेले, ज्याचे वितरण मंत्री आदिती तटकरे यांनी केले. या कर्जातून महिलांच्या उद्योजकतेला आणि आत्मविश्वासाला बळ मिळेल असे तटकरे यांनी सांगितले.

लाभार्थी बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागेल. फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि Captcha Code टाकून, OTP द्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यावरच लाभार्थी रक्कम प्राप्त करू शकतील. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांकही नोंदवणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

राजकारण्यांची”फटाके”बाजी….

मध्यरात्री आगीचा तांडव ,सोसायटीत भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *