महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती(scholarship) परीक्षेच्या रचनेत आणि रकमेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून पाचवी आणि आठवीसाठी होणारी ही परीक्षा आता पुन्हा जुन्या पद्धतीने चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. यासोबतच शिष्यवृत्तीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल.

शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, पूर्वी पाचवी आणि आठवी इयत्तेसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी(scholarship) आयोजित केली जाईल. १९५४ पासून ही परीक्षा याच वर्गांसाठी होत होती, मात्र २०१६ मध्ये त्यात बदल करून ती पाचवी आणि आठवीसाठी लागू करण्यात आली होती. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली होती.
हा बदल करताना या वर्षासाठी एक विशेष तरतूद करण्यात आली आहे. यंदा पाचवी आणि आठवीचे विद्यार्थीही परीक्षेला बसू शकतील, मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ चौथी आणि सातवीचे विद्यार्थीच पात्र असतील. पाचवी/आठवीसाठी परीक्षा सुरू केल्यावर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच, परीक्षेच्या नावातही बदल करत ‘पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती’ ऐवजी ‘प्राथमिक शिष्यवृत्ती’ आणि ‘पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती’ ऐवजी ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती’ असे नामकरण करण्यात आले आहे.

परीक्षेच्या वर्गात बदल करण्यासोबतच, सरकारने शिष्यवृत्तीच्या रकमेतही वाढ केली आहे. नव्या निर्णयानुसार, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वार्षिक ५००० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती पुढील तीन वर्षांसाठी दिली जाईल.त्याचप्रमाणे, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (सातवी) परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५०० रुपये, म्हणजेच दरमहा ७५० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीचा कालावधीही तीन वर्षांचा असेल. या परीक्षेसाठी बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २०० रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती व दिव्यांगांना १२५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागते.
हेही वाचा :
कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!
नवऱ्याच्या अफेअरचा बदला,बायकोने गुप्तांगावर उकळतं पाणी व अॅसिड ओतलं..
कोल्हापुरात भीषण अपघात; लक्ष्मी पुजनाच्या दिवशी बहीण- भावाचा मृत्यू…