सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अगदी लहानांपासून(grandmother) ते मोठ्यांपर्यंत सर्वजण काही ना काही मजेशीर कंटेट क्रिएट करत असतात. अनेकदा काही असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आपल्याला हसू आवरणे कठीण जाते. तर काही वेळा आवाक् करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात.

सध्या असाच एक हैराण करवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वय फक्त एक संख्या आहे, या म्हणीचे चित्रण या व्हिडिओतून झाले आहे. ब्रिटनहून भारतात फिरायला आलेल्या एका ८५ वर्षाच्या आजीने असे काही केलं आहे की आजची तरुणाई देखील लाजेल. या आजीने ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंगचा थरारक अनुभनव घेतला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांची आजी जोमात, लोक कोमात अशी अवस्था झाली आहे. तसेच पाहायला गेले तर अशा वयात अनेकदा लोकांना शारिरीक त्रास होत असतात. पाय दुखणे, सांध दुखणे यांसारख्या आजारांनी वयोवृद्ध (grandmother)लोक त्रस्त असतात. पण काही वडिलधारे अशा थरारक कृतींनी लोकांना जीवन जगण्याचा एक वेगळा अनुभव देऊन जातता.
या व्हिडिओवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला जगता आला पाहिजे. यासाठी काही सर्वांनीच बंजी जम्पिंग करण्याची गरज नाही, पण आपल्याला करायच्या असलेल्या गोष्टींचा अनुभव घेणं महत्त्वाचे आहे. तसेच अशा गोष्टी करताना जगाचा, वयाचा आणि इतर अनेक पैलूंचा विचार करण्याची गरज नाही. सध्या या ब्रिटनहून आलेल्या आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @himalayanbungy या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी आजींचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, कूल लेडी, माझ्यापेक्षा जास्त धाडसी आहे, तर दुसऱ्या एकाने, ती मी आहे फ्यूचरमधील असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने आजी आयुष्याचा खरा आनंद घेत आहेत असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत लोकांनी आजींचे कौतुक केले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ,भाऊबीजला सरकारकडून खास ओवाळणी
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….
राजकारण्यांची”फटाके”बाजी….