चेक(Cheque) क्लिअर होणे ही बॅंक ग्राहकांसाठी अत्यंत वेळखावू प्रक्रिया आहे. मात्र आता काही तासांत चेक क्लिअर होणार आहे. कारण 4 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बॅंक एक नवी प्रणाली आणणार आहे. ज्यामुळे काही तासांत चेक क्लिअर होणार आहे. त्यामुळे सध्या चेक क्लिअर व्हायला लागणारा 2 कार्यालयीन दिवसांचा वेळ कमी होणार आहे.

कार्यालयीन दिवसांमध्ये सतत चेक स्कॅन, सादर आणि पास केला जाईल. त्यामुळे सध्या चेक क्लिअर व्हायला लागणारा 2 कार्यालयीन दिवसांचा वेळ काही तासांवर येईल. चेक (Cheque)क्लिअरन्समध्ये सुधारणा आणणे, जोखिम कमी करणे आणि ग्राहकांना गतिशील सेवा देण्यासाठी आरबीआयने चेक क्लिअरन्समध्ये सुधारणा करून ऑन-रिअरलायझेन-सेटलमेंट आणण्यास सांगितले आहे. याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की, चेक क्लिअरन्ससाठी दोन टप्प्यात सुधारणा करण्यात येणार आहे. पहिला टप्पा 4 ऑक्टोबर 2025 ला आणि दुसरा 3 जानेवारी 2026 ला लागू करण्यात येईल. कार्यालयीन दिवसांमध्ये सतत चेक स्कॅन, सादर आणि पास केला जाईल. त्यामुळे सध्या चेक क्लिअर व्हायला लागणारा 2 कार्यालयीन दिवसांचा वेळ काही तासांवर येईल. त्यामुळे तुमचा चेक क्लिअर झाला आहे किंवा बाऊंस झाला आहे. हे तुम्हाला तात्काळ कळणार आहे.

त्यामुळे बॅंकांच्या शाखांना त्यांच्या चेक्समध्ये काही कमतरता आहे का? याची सायंकाळी 7 च्या आत पुष्टी करावी लागणार आहे. अन्यथा तो चेक स्विकारला जाऊन क्लिअर केला जाईल. तर 3 जानेवारी नंतर तर चेक क्लिअरन्स फक्त 3 तासांत होणार आहे.

हेही वाचा :

तारक मेहता..’मधील दयाबेनच्या लग्नातील फोटो पहिल्यांदाच समोर

‘माधुरी’वर सर्वोच्च न्यायालयात कोणता निर्णय होणार?

साधूंच्या वेशात आले, ‘रक्षा’ बांधून महिलेला भुरळ घातली अन् 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *