लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(update)लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात ऑक्टोबरचे पैसे जमा केले जाणार आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. महिनाअखेरला फक्त ८ दिवस उरले आहेत. दरम्यान, या ८ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेला होता. सप्टेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (update)लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी येत्या ८ दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लवकरच याबाबत माहिती दिली जाईल.लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत केवायसी तुर्तास बंद करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.(update) यासाठी अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरु आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच अकाउंटमध्ये १५०० रुपये जमा केले जाणार आहे. यासाठी अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. लाडक्या बहिणींची केवायसी अनिवार्य केली आहे.
हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण