राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज फलटणमध्ये जाऊन जिल्हा रुग्णालयाबरोबरच फलटण पोलीस स्थानकाला भेट देऊन डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर रुपाली चाकणकरांनी पत्रकारांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली(Rape). यावेळेस चाकणकरांनी जानेवारी ते मार्चदरम्यान मयत महिला डॉक्टर आणि पोलीस अधिकारी गोपाळ बदाणेंदरम्यान फोनवरुन बोलणं झालं होतं असं सांगितलं. तसेच कोणी कोणाविरुद्ध कधी तक्रार केली होती याबद्दलचीही माहिती रुपली चाकणकरांनी दिली.

“मी आरोग्य अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत जवळपास तासभर चर्चा केली. मी महिन्याभरापूर्वी इथे येऊन गेलेली. मी जनसुनावणीच्या निमित्ताने इथे आयसी कमिटी आहेत का हे तपासून पाहतो. त्या सक्रीय असतील याची काळजी घेतली. ऑगस्टमध्ये शिफारस केलेली की या कमिटी सक्रीय असाव्यात. कामाच्या ठिकाणी लैंगिक(Rape) अत्याचार रोखण्यासाठी या कमिटी काम करतात. महाराष्ट्रातील 31 टक्के महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करतो. आरोग्य समितीच्या आयसी कमिटीकडे तक्रार करण्यात आलेली नव्हती,” असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं.

“पोलिसांची डॉक्टरांच्या आणि डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात तक्रार. चौकशी समितीच्या माध्यमातून केस निकाली काढली होती. 23 ऑगस्ट 2025 रोजी चौकशी झाली. त्यांची जी तक्रार होती एकमेकांबद्दल फिट-अनफिट अहवाल देण्यासंदर्भातील कामात दिरंगाई करण्याची तक्रार होती. डॉक्टरांचीही अशी तक्रार होती की फिट-अनफिटसंदर्भात अगदी रात्री आरोपी आणले जायचे. त्यामुळे कामाच्या वेळेत आरोपी अणावेत असं म्हणणं होतं. डॉक्टरांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित बोलावं असं चौकशी समितीने म्हटलं होतं,” असंही रुपाली चाकणकरांनी सांगितलं. “तीन वेळा बदली होत असतानाच फलटणच उपजिल्हा रुग्णालय हवं असा गोपाळ बदाणेचा आग्रह होता. म्हणून विशेष आदेश काढून त्याला संधी दिली होती,” असंही चाकणकर म्हणाल्या.

“पोलिसांनी सीडीआर काढला आहे. त्यामध्ये सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं होती. गोपाळ बदाणे, प्रशांत बनकर यांची नावं होती. जानेवारी ते मार्च दरम्यान गोपाळ बदाणेंसोबत संवाद झालेला रेकॉर्ड आहे. त्यानंतर संबंधितांबरोबर कोणताही संवाद नाही. त्यानंतर प्रशांत बनकरबरोबर संवादाचा रेकॉर्ड आहे,” असं रुपाली चाणकर म्हणाल्या.”जानेवारी ते मार्चमध्ये गोपाळ बदाणे यांच्यामध्ये संवाद झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये जसं लिहिण्यात आलं आहे की चारवेळा बलात्कार केला. त्यानुसार त्या दोघांचं लोकेशन कुठे एकत्र होतं का हे सीडीआरच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. सीडीआर आणि फॉरेन्सिकच्या अहवालातून लोकेशन शोधलं जाईल. तसेच गोपाळ बदाणेकडूनही पोलिस जबाब नोंदवून घेत आहेत. याच अनुषंगाने पुढील तपास होईल. सीडीआर या तिघांचा काढला आहे. इतरांचा सीडीआर गरजेचा पडला तर तो काढला जाईल,” असं रुपाली चाकणरांनी स्पष्ट केलं.

आरोपी पोलीस दलातील असल्याने निष्पक्ष चौकशी होईल का या प्रश्नावर रुपाली चाणकरांनी, “आरोपी म्हणूनच पोलीस तपास करत आहेत. सीडीआर, फॉरेन्सिकचा अहवाल अशीच कारवाई होतील. तपास एसपी, डीव्हायएसपी, सायबर सर्व एकत्रितपणे तपास करत आहेत. महिला आयोग रोज अपडेट घेतोय. आम्ही आवश्यक सूचना केल्या आहेत,” असं सांगितलं.

हेही वाचा :

८ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होणार….

Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार….

सर्व बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *