नागपूरमधील गणेशपेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात झालेल्या लावणी(lavani) सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

रविवारी पार पडलेल्या या स्नेहमिलन कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी लावणीचे आकर्षक सादरीकरण केले. विशेष म्हणजे, शिल्पा शाहीर या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी (lavani)असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारचे सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेकांनी सोशल मीडियावरून या कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, काहींनी पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचेही म्हटले आहे. या घटनेनंतर अजित पवार गटाच्या स्थानिक नेतृत्वाकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे.
हेही वाचा :
चारवेळा बलात्कार केल्याचं दोघांच्या लोकेशनवरुन…’; फोन रेकॉर्डसंदर्भात मोठा खुलासा
८ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होणार….
Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार….