स्टार प्रवाह (Star Pravah)वाहिनीवर आजपासून प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका घेऊन येत आहे — ‘काजळमाया’. ही मालिका सुरू होताच एक लोकप्रिय मालिका ‘अबोली’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 2021 साली प्रसारित झालेली आणि तब्बल 1200 पेक्षा जास्त भागांची ही मालिका गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.

अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता सचित पाटील यांच्या जोडीने सजलेली ही मालिका आता संपुष्टात आली आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवशीचा खास व्हिडिओ गौरीने सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.दरम्यान, ‘काजळमाया’ ही हॉरर मालिका असून, यात अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय घटनांवर आधारित या मालिकेत भय आणि रोमांच यांचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.

या नव्या मालिकेसह स्टार प्रवाहच्या(Star Pravah) मालिका वेळेतही बदल करण्यात आला आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ आता रात्री 8 वाजता आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहची सायंकाळ अधिक मनोरंजक ठरणार आहे.

हेही वाचा :
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ
AI मंत्री डिएला झाली ‘गर्भवती’; एकाचवेळी ८३ मुलांना देणार जन्म…
एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर….